ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी भाजप आणि मोदी सरकारविरोधात काँग्रेसचे राज्यव्यापी आंदोलन

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यानी मंत्रालयाजवळील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ ओबीसींचे राजकीय आरक्षण संपविणा-या  केंद्रातील भाजप सरकारविरोधात आंदोलन केले. यावेळी ओबीसी आरक्षण रद्द होण्याला जबाबदार असणा-या केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी मंत्रालयाजवळील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करून निषेध केला. तर नांदेड मध्ये केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारविरोधात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन करण्यात आले.

    मुंबई : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमधील इतर मागसा वर्गाच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सध्या सत्ताधारी महाविकास आघाडीने केंद्र सरकारला जबाबदार धरले आहे. या निर्णयाविरोधात काँग्रेसकडून आज केंद्र सरकारविरोधात राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले आहे.  सर्वोच्च न्यायालयाने देशातील ओबीसीची आकडेवारी केंद्र सरकारकडे मागितली होती. परंतु केंद्र सरकारने ही आकडेवारी सर्वोच्च न्यायालयास दिली नाही. त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. केंद्र सरकारच्या ओबीसी विरोधी धोरणाचा निषेध म्हणून शनिवार २६ जून रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती दिनी म्हणजेच सामाजिक न्याय दिनी काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्रातील भाजप सरकारविरोधात राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

    मंत्रालयाजवळ गांधी पुतळ्याजवळ आंदोलन

    महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यानी मंत्रालयाजवळील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ ओबीसींचे राजकीय आरक्षण संपविणा-या  केंद्रातील भाजप सरकारविरोधात आंदोलन केले. यावेळी ओबीसी आरक्षण रद्द होण्याला जबाबदार असणा-या केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी मंत्रालयाजवळील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करून निषेध केला. तर नांदेड मध्ये केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारविरोधात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन करण्यात आले.

    पुण्यात केंद्र सरकारच्या ओबीसी विरोधी धोरणाचा निषेध म्हणून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी म्हणजेच सामाजिक न्याय दिनी काँग्रेस पक्षाच्यावतीने छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन पुणे येथील आरटीओ चौकात प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी आणि शहर अध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. मोहन जोशी यावेळी बोलताना म्हणाले की भाजपचे सरकार असताना इतर मागासवर्गाचे आरक्षण गेले असताना भाजप दुटप्पी भुमिका घेवून  उल्ट्या बोंबा मारत आहे त्या विरोधात आम्ही आज अंदोलन करत आहोत.