शेअर बाजारात घसरण सुरुच! व्यवहार सुरू होताच सेन्सेक्स 1000 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदार टेन्शनमध्ये

आजही (गुरुवारी) कायम राहिली. त्यामुळं ज्यांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे, ते टेन्शनमध्ये आले आहेत. गुंतवणुकदारांकडून शेअर्सची चौफेर विक्री सुरू असल्याचा परिणाम  बाजारावरही दिसून आला. व्यवहार सुरू होताच सेन्सेक्स 1000 अंकांची घसरण झाली.

    मुंबई : एक दोन महिन्यांपूर्वी तेजीत असणारा शेअर बाजार मागील काही दिवसांपासून घसरण सुरु आहे. शेअर बाजारात सुरू असलेली घसरण आजही (गुरुवारी) कायम राहिली. त्यामुळं ज्यांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे, ते टेन्शनमध्ये आले आहेत. गुंतवणुकदारांकडून शेअर्सची चौफेर विक्री सुरू असल्याचा परिणाम  बाजारावरही दिसून आला. व्यवहार सुरू होताच सेन्सेक्स 1000 अंकांची घसरण झाली. शेअर बाजाराच्या प्री-ओपन सत्रापासूनच बाजारात घसरण होण्याचे संकेत मिळत होते. बाजार सुरू होताच सेन्सेक्समध्ये 996.23 अंकांची घसरण होऊन निर्देशांक 57 हजारांखाली आला. निफ्टीतही घसरण दिसून आली. बाजारात पुन्हा तेजी दिसून येईल अशी गुंतवणूकदारांना आशा आहे.

    दरम्यान, निफ्टीत जवळपास 1.5 टक्क्यांची घसरण होऊन निर्देशांक 17 हजाराच्या नजीक पोहचला. आज शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर चढ-उतार राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.  परदेशी गुंतवणुकदारांनी विक्रीचा सपाटा सुरू केल्याने बाजारात घसरण झाली असल्याची चर्चा आहे. दरम्यान, याआधी सलग पाच दिवसाच्या घसरणीनंतर मंगळवारी शेअर बाजार काही प्रमाणात सावरला होता. मंगळवारी सुरुवातीला 1000 अंकांची घसरण दिसून आली. त्यानंतर बाजार सावरला आणि व्यवहार थांबला तेव्हा सेन्सेक्स 366.64 अंकांनी वधारला होता. तर, निफ्टीत 118.30 अंकानी वधारला. शेअर बाजारात विक्रीचा मोठा दबाव दिसून येत आहे. त्यामुळं ज्यांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे, ते टेन्शनमध्ये आले आहेत.

    या आठवड्यात अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हची महत्त्वपूर्ण बैठक बुधवारी संपली. या दोन दिवसीय बैठकीत फेडरल रिझर्व्हने मार्चमध्ये व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेतला. या घोषणेचा परिणाम जगभरातील शेअर बाजारावर दिसून आला. गुंतवणुकदारांनी मोठ्या प्रमाणावर विक्री सुरू केली. आशियाई शेअर बाजारात घसरण झाली आहे. फेडरल रिझर्व्ह बँक व्याज दर वाढवण्याचा निर्णय घेणार असल्याचा अंदाज याआधीत वर्तवण्यात येत होता. त्यामुळं फेडरल रिझर्व्ह बँकेचा परिणाम शेअर बाजारावर दिसून येत असल्याच शेअर मार्केट तज्ज्ञांनी म्हटले आहे.

    दरम्यान, शेअर बाजारात मागील काही दिवसांपासून मंदी असल्याचे दिसून येत आहे, सोमवार आणि मंगळवारी बाजार स्थिरावल्यानंतर आज गुरुवारी पुन्हा शेअर बाजार विक्रमी १००० अंकांनी घसराला. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचा वातावरण आहे. पण जर मागील दहा पंधरा वर्षांचा इतिहास पाहिला तर जानेवारी महिन्यात शेअर बाजार कोसळतो, कारण १ फेब्रुवारीला बजेट असते. तसेच यावेळी विदेशी वित्तीय संस्था, आणि परदेशी गुतवणूकदारांनी अधिक गुंतवणूक केल्यामुळे याचा परिणाम थेट शेअर बाजारावर झाला असल्याचे शेअर बाजार अभ्यासक, सीए, निखिलेश सोमण यांनी म्हटले आहे.