केंद्राकडून आणि गुजरातकडून महाराष्ट्राचे वैभव पळवण्याचा प्रकार आधी थांबवा; उद्योगमंत्री सुभाष देसाईचे अमित शहांच्या टिकेला प्रत्युत्तर

केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी पुण्यात येवून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विश्वासघात केल्याचा ठपका ठेवला आहे. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि महाविकास आघाडीने एकत्र लढून भाजपचा पराभव करून दाखवावा, असे आव्हानही शहा यानी दिले आहे. त्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांच्या हळुहळू प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेनेचे नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनीही शहा यांच्या विधानाचा समाचार घेताना म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या वैभवाची शाहांना दाखल घ्यावीशी वाटत असेल किंवा मदत करायची असेल तर त्यांच स्वागत आहे. महाराष्ट्रातील उद्योग हे केंद्राकडून आणि गुजरातकडून पळवले जात आहेत ते आधी थांबवा असा सल्लाही त्यांनी दिला आहे(Stop robbing Maharashtra of its glory first from Center and Gujarat; Industry Minister Subhash Desai responds to Amit Shah's criticism).

    मुंबई : केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी पुण्यात येवून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विश्वासघात केल्याचा ठपका ठेवला आहे. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि महाविकास आघाडीने एकत्र लढून भाजपचा पराभव करून दाखवावा, असे आव्हानही शहा यानी दिले आहे. त्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांच्या हळुहळू प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेनेचे नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनीही शहा यांच्या विधानाचा समाचार घेताना म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या वैभवाची शाहांना दाखल घ्यावीशी वाटत असेल किंवा मदत करायची असेल तर त्यांच स्वागत आहे. महाराष्ट्रातील उद्योग हे केंद्राकडून आणि गुजरातकडून पळवले जात आहेत ते आधी थांबवा असा सल्लाही त्यांनी दिला आहे(Stop robbing Maharashtra of its glory first from Center and Gujarat; Industry Minister Subhash Desai responds to Amit Shah’s criticism).

    केंद्र सरकारकडून महाराष्ट्रात अन्याय

    केंद्रीय गृहमंत्री अमित यांचे हे राजकीय भाष्य होते. राज्याला गतवैभव मिळवून देण्यास मविआ हतबल असे अमित शाह म्हणाले आहेत, त्याला योग्य ते उत्तर आमचे नेते देतील. ते पुढे म्हणाले की, कोरोना काळात २ दशलक्ष रुपयांचे उद्योग आणले. रोजगारात मोठी वाढ होताना दिसून येत आहे. केंद्र सरकारकडून महाराष्ट्रात अन्याय होतो आणि वैभव पळवण्याचे प्रकार होत आहे. मागच्या पाच वर्षातही असा प्रयत्न केला आहे. म्हणूनच सरकार गप्प होते. पण आम्ही बोलतो. आंतरराष्ट्रीय वित्त केंद्राचा अधिकार मुंबईला आहे. मुंबईत मोठ्या बँका, स्टॉक एकचेंज आहे. दोहा या देशाने जी बँक उघडली त्यांनी मुंबईचा विचार केला आहे. ते जर मुंबईत केले तर त्याचा फायदा झाला असता. परंतु इथे सर्व दिव्याखाली अंधार असल्यासारखे दिसत आहे, असेही देसाई म्हणाले.

    कोरोनाकाळात  जनसेवा केल्याने महाराष्ट्राचे कौतुक

    केंद्र सरकारने नागपुरातील दत्तोपट्टी कामगार ठेंगडी संस्था हलवली. डॉक्टर आणि नर्स टंचाई भासते त्याला महाराष्ट्राने तोंड दिले. कोरोनाकाळात  डॉक्टरांनी जीव धोक्यात घालून जनतेची सेवा केली. या सगळ्याचे जनतेतून कौतुक झाले. इतरांनीही महाराष्ट्राबाबत कौतुक केले. महाराष्ट्र हे मोठे राज्य आहे. उत्तरप्रदेशात २७ महाविद्यालय आहेत. २०१४ ते २०२१ मध्ये केवळ २ वैद्यकीय महाविद्यालय मिळाली आहेत. यासाठी केवळ २६२ कोटींचा निधी दिला असून हा महाराष्ट्रावरचा अन्याय असल्याचे देसाई यानी म्हटले आहे.