आघाडीला बळ की भाजपात भर? वैदर्भीय नेत्यांच्या दाव्यांमुळे चर्चेला उधाण; सत्ताधाऱ्यांचे संख्याबळ वाढणार?

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या आक्षेपानंतर महाविकास आघाडी सरकारने विधानसभा अध्यक्षाची निवडणूक लांबणीवर टाकली. आम्ही राज्यपालांच्या पत्राचा सन्मान केला. महाविकास आघाडीकडे सध्या 174 आमदार आहेत आणि आता आणखी काही आमदार वाढणार आहेत, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. पटोलेंच्या या वक्तव्यामुळे भाजपामधील काही आमदार फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे(Strengthen the front or fill the BJP? The claims of Vaidyarvi leaders have sparked controversy; Will the number of those in power increase?).

    मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या आक्षेपानंतर महाविकास आघाडी सरकारने विधानसभा अध्यक्षाची निवडणूक लांबणीवर टाकली. आम्ही राज्यपालांच्या पत्राचा सन्मान केला. महाविकास आघाडीकडे सध्या 174 आमदार आहेत आणि आता आणखी काही आमदार वाढणार आहेत, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. पटोलेंच्या या वक्तव्यामुळे भाजपामधील काही आमदार फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे(Strengthen the front or fill the BJP? The claims of Vaidyarvi leaders have sparked controversy; Will the number of those in power increase?).

    महाविकास आघाडी सरकारमध्ये 174 आमदार आहे आणि आता आणखी काही आमदार वाढणार आहेत. आम्ही दिल्लीतील सरकारचे ऐकत नाही. आम्ही लोकशाही मानतो, लोकांची मते जाणून घेतो. ते ठोकशाही आणि हुकूमशाही करणारे सरकार आहे. पहाटेचे सरकार पडल्यानंतर राज्यात कुठली परिस्थिती ओढवली होती की, राष्ट्रपती राजवट लावावी लागली. राष्ट्रपती राजवटसारख्या आयुधांचा वापर चुकीच्या पद्धतीने केला जातो हे लोकशाहीसाठी धोक्याची आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

    50- 60 आमदार सरकारवर नाराज

    शिर्डी, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क. महाविकास आघाडीचे 50 ते 60 आमदार सरकारवर नाराज आहेत. मुख्यमंत्री भेटत नसल्याने आमदारांमध्ये नाराजी वाढली आहे. त्याचा फटका बसू नये म्हणूनच सरकारला विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या नियमात बदल करावे लागले, असा दावा भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. बावनकुळे यांच्या दाव्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे आमदार भाजपाच्या गळाला लागतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

    विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी राज्यसरकारला कायदा आणण्याची गरज का पडली? गुप्त मतदानाचा कायदा असताना या सरकारला आपल्या आमदारांवर विश्वास का नाही? जवळपास 50 ते 60 सत्ताधारी आमदार सरकारवर नाराज आहेत. 16 महिने मुख्यमंत्री भेटत नसतील, त्यांची कामे होत नसतील तर काय होणार? असे भाजपा आमदार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.