
दगडफेक करत आपल्या रोजी राटी वरती लाथ मारणाऱ्या कर्मचाऱ्यावर कडक कारवाई होणार असा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला आहे ( Strict action will be taken against the employee who throws stones at the st; Transport Minister Anil Parab's warning). एसटी कर्मचाऱ्यांचे नेतृत्व कोण करते आहे याच्याशी आम्हाला घेणे देणे नाही. कामगारांचा प्रश्न आम्हाला महत्वाचा वाटतो, मात्र जे या आंदोलनाची जबाबदारी घेत आहेत त्यांनी होणाऱ्या नुकसानीची ही जबाबदारी घेतली पाहिजे असेही ते म्हणाले.
मुंबई : दगडफेक करत आपल्या रोजी राटी वरती लाथ मारणाऱ्या कर्मचाऱ्यावर कडक कारवाई होणार असा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला आहे ( Strict action will be taken against the employee who throws stones at the st; Transport Minister Anil Parab’s warning). एसटी कर्मचाऱ्यांचे नेतृत्व कोण करते आहे याच्याशी आम्हाला घेणे देणे नाही. कामगारांचा प्रश्न आम्हाला महत्वाचा वाटतो, मात्र जे या आंदोलनाची जबाबदारी घेत आहेत त्यांनी होणाऱ्या नुकसानीची ही जबाबदारी घेतली पाहिजे असेही ते म्हणाले.
कालपर्यंत १८ हजार कर्मचारी कामावर परतले
विधान भवना बाहेर विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडल्यानंतर परब बोलत होते. ते म्हणाले की, कालपर्यंत १८ हजार कर्मचारी परत कामावर आले आहेत. एका कर्मचाऱ्याने दगडफेक केली आहे त्याने आपल्या रोजी राटी वरती लाथ मारली आहे. त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल, असेही परब म्हणाले. ते म्हणाले की, विलीनीकरण्याच्या मुदयावर समिती गठित केली आहे त्यामुळे सध्या काहीच करता येत नाही. काहीजण कर्मचाऱ्यांच्या भावना भडकावत आहेत, असेही परब म्हणाले. पगार वेळेवर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात कामगारांचे नुकसान होत आहे. कोणत्याही नेत्याचे नुकसान होत नाही असे त्यांनी सांगितले.
हिवाळी अधिवेशनात एकूण १२ विधेयके
दरम्यान, राज्याचे हिवाळी अधिवेशन मुंबईत होण्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगताना ते म्हणाले की, मुख्यमंत्र्याची प्रकृती बरी नसल्याने ते रुग्णालयात उपचार घेत आहेत, मात्र तरीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अधिवेशनाला प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबरपासून मुंबईमध्ये होणार आहे. अधिवेशन वाढवायचे किंवा नाही याचाही विचार केला जाईल, असेही राज्याचे विधानकार्यमंत्री अनिल परब यांनी सांगितले. ते म्हणाले की, या हिवाळी अधिवेशनात एकूण १२ विधेयके असणार आहेत. तर तारांकीत प्रश्नांसंदर्भात गुरुवारी सभापतीकडे बैठक होणार आहे, असे परब यांनी सांगितले. अनिल परब म्हणाले की, २४ डिसेंबरला पुन्हा बैठक घेऊन अधिवेशन वाढवायचे किंवा नाही यावर निर्णय होईल. तसेच ज्यांचे दोन डोस झाले आहेत त्यांनाच अधिवेशनामध्ये प्रवेश मिळणार आहे, असेही परब यांनी सांगितले.