Strict security! 3,122 CCTV cameras at Central Railway stations; 24-hour watch on crime and women's safety

  मुंबई : मध्य रेल्वेने कडक सुरक्षेसाठी उपनगरीय स्थानकांवर ३,१२२ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. गेल्या वर्षी २०२१ मध्ये ६०५ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आल्याचे सांगण्यात आले. उपनगरीय स्थानकांवरील गर्दीत असामाजिक तत्वांवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या ३,१२२ करण्यात आली आहे(Strict security! 3,122 CCTV cameras at Central Railway stations; 24-hour watch on crime and women’s safety).

  ९ स्थानकांच्या १२ वेगवेगळ्या ठिकाणी प्रकाशासाठी हाय मास्ट बसवले आहेत. यामध्ये कुर्ल्यात दोन, ठाणे, कळवा, कल्याण, आसनगाव, शहाड येथे प्रत्येकी एक, उल्हासनगरमध्ये तीन, आटगाव आणि टिटवाळा स्थानकातील एक यांचा समावेश आहे.

  मध्य रेल्वेच्या सर्व स्थानकांवर व्हिडिओ देखरेख प्रणाली (VSS) अंतर्गत सीसीटीव्हीच्या तरतुदीसाठी रेलटेलसोबत सामजंस्य करार करण्यात आला आहे. ज्यासाठी लवकरच निविदा काढल्या जातील. याव्यतिरिक्त, ब्लॉक स्पॉट्स ओळखले गेले आहेत. गोळीबार किंवा स्नॅचिंगच्या घटनांसाठी संवेदनशील ठिकाणी कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. पब्लिक अॅड्रेस सिस्टीमवर उपनगरीय गाड्यांमध्ये जनजागृती संदेशही नियमितपणे चालवले जातात.

  लोकलच्या ११० रेकचे संचालन

  मुंबई विभागात दररोज सरासरी ११० उपनगरीय रेक चालवले जातात. याशिवाय १०५ मेल/एक्स्प्रेस गाड्या चालवल्या जातात. रात्रीच्या गाड्यांमध्येही ट्रेन एस्कॉर्ट कर्मचारी तैनात केले जात आहेत. महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मुंबई विभागात ५ विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. महिलांच्या सुरक्षिततेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी अनुक्रमे ‘मेरी सहेली’ आणि ‘स्मार्ट सहेली’ ऑपरेशन्स सुरू करण्यात आली आहेत.

  हे सुद्धा वाचा
  • 2022