mega block

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून सुटणाऱ्या डाऊन धीम्या (down slow) मार्गावरील विशेष सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार (Vidyavihar) स्थानकांदरम्यान डाऊन जलद (down fast) मार्गांवर वळविण्यात येतील आणि त्यांच्या निर्धारित थांब्यावर थांबतील. अप धीम्या मार्गावरील विशेष सेवा विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान अप जलद मार्गावर वळविण्यात येतील आणि निर्धारित थांब्यावर थांबतील.

  • १५ मिनिटांनी उशिरा धावणार मेल, एक्सप्रेस गाड्या

मुंबई (Mumbai) : मध्य रेल्वे (Central Railway), मुंबई विभाग (Mumbai Division) रविवारी (Sunday विविध अभियांत्रिकी व देखभालीच्या कामांसाठी उपनगरी मार्गावर मेगाब्लॉक (Mega Block) घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेकडून (Western Railway) शनिवारी रात्री ९ वाजल्यापासून ते रविवारी दुपारी १ वाजेपर्यंत जम्बो मेगाब्लॉक (jumbo megablock) घेण्यात येणार आहे. मध्ये रेल्वे अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार दरम्यान अप व डाऊन धीम्या मार्गावर (up & down slow) सकाळी १०:०० ते दुपारी ३:०० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल.

पनवेल-वाशी दरम्यान अप व डाऊन मार्गावर सकाळी १०:४० ते दुपारी ३:४० पर्यंत मेगाब्लॉक असेल. अप हार्बर मार्गावर पनवेल येथून सकाळी १०:३० ते दुपारी ३:३५ या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या विशेष सेवा बंद राहतील.

डाऊन हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून सकाळी ९:३० ते दुपारी २:३० या वेळेत पनवेलकडे जाणाऱ्या विशेष सेवा बंद राहतील. ब्लॉक कालावधीत विशेष उपनगरी रेल्वे गाड्या छत्रपती शिवाजी शिवाजी महाराज टर्मिनस-वाशी विभागात चालविण्यात येतील.

पश्चिम रेल्वे मार्गावर जम्बो ब्लॉक

पायाभूत सुविधा व सुरक्षिततेसाठी हे देखभाल करणारे मेगाब्लॉक आवश्यक आहेत असे, मध्ये रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे. पश्चिम रेल्वेचा शनिवार ब्लॉक तर वसई रोड व विरार स्टेशनच्या दरम्यान रविवारी जम्बो ब्लॉक ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणे देखभाल करण्याचे काम करण्यासाठी शनिवारी रात्री ९:०० ते रविवारी दुपारी १:०० वाजेपर्यंत वसई रोड ते विरार दरम्यानअप व डाऊन जलद मार्गावर मोठा ब्लॉक घेण्यात येईल. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिलेल्या पत्रकातील माहितीनुसार, सर्व मेल / एक्सप्रेस गाड्या १५ मिनिटे उशिराने चालणार आहेत.