सुप्रिया सुळे ‘अ‍ॅक्शन मोड’मध्ये! काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची घेतली भेट, राज्यातही जोरदार प्लॅनिंग

सुप्रिया सुळे यांनी ट्विट करुन यासंदर्भातील माहिती दिली आहे. तुमच्याशी चर्चा करणे हे नेहमीच आनंददायी असते. तुमच्या बहुमोल मार्गदर्शनासाठी खूप आभारी आहे, असं सुप्रिया सुळे यांनी ट्विट केलं आहे.

    मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या खळबळजनक पत्रावरून विरोधकांनी टीकेची झड उठवली आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकारमधील तिनही पक्षांच्या नेत्यांची खलबतं सुरू असतानाच दिल्लीतही हालचाली सुरू झाल्या आहेत.

    काही दिवसांपूर्वीच राज्यातील काँग्रेस नेत्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली होती. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या घरी ही बैठक पार पडली होती. या बैठकीत या प्रकरणांवर चर्चा झाली होती. त्यामुळं सुप्रिया सुळेंनी सोनिया गांधीची घेतलेली भेट महत्त्वाची ठरत आहे.

    सुप्रिया सुळे यांनी ट्विट करुन यासंदर्भातील माहिती दिली आहे. तुमच्याशी चर्चा करणे हे नेहमीच आनंददायी असते. तुमच्या बहुमोल मार्गदर्शनासाठी खूप आभारी आहे, असं सुप्रिया सुळे यांनी ट्विट केलं आहे. सुप्रिया सुळे यांची सोनियांसोबतची चर्चा नेमकी कोणत्या विषयावर झाली हे जरी स्पष्ट होऊ शकलं नसलं तरी महाराष्ट्रातील सध्याची राजकीय स्थिती पाहता याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे आणि सोनिया गांधींमध्ये संवाद झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

    दरम्यान, दुसरीकडे राज्यातही महाविकास आघाडीचे नेतेही विरोधकांच्या आरोपांमधली हवा काढण्यासाठी जोरदार तयारी करत असल्याचं सांगितलं जात आहे.