corona virus

ब्रिटन आणि पश्चिम आशियातून मुंबईत दाखल झालेल्या २६०० प्रवाशांपैकी १२ प्रवासी काेराेना पाॅझिटिव्ह आढळून आले होते. मात्र पुन्हा चाचणी केल्यानंतर यापैकी ६ प्रवासी काेराेना निगेटिव्ह( six passengers corona negative) असल्याची माहिती मुंबई पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकानी(suresh kakani) यांनी दिली आहे.

मुंबई: ब्रिटन आणि पश्चिम आशियातून मुंबईत दाखल झालेल्या २६०० प्रवाशांपैकी १२ प्रवासी काेराेना पाॅझिटिव्ह आढळून आले होते. मात्र पुन्हा चाचणी केल्यानंतर यापैकी ६ प्रवासी काेराेना निगेटिव्ह( six passengers corona negative) असल्याची माहिती मुंबई पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकानी(suresh kakani) यांनी दिली आहे.

ब्रिटनमधून येणाऱ्या प्रवासांची सध्या तपासणी सुरु असून आतापर्यंत आलेल्या प्रवाशांपैकी १२ प्रवासी काेराेना संक्रमित आढळून आले आहेत. तर मंगळवारी आलेल्या अहवालातून यापैकी ६ प्रवासी निगेटिव्ह आढळले आहेत. या प्रवाशांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरही या प्रवाशांना खबरदारीचा उपाय म्हणून पुढील १४ दिवस क्वारंटाईन करण्यात येणार आहे. तसेच यापैकी काेणत्याही प्रवाशाला काेराेनाच्या काेणताही नवीन प्रकाराची लागण झालेली नसल्याचेही समाेर आले आहे. दरम्यान, प्रवाशांना सेव्हन हिल्स रुग्णालयात क्वारंटाईन करुन त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तसेच जे प्रवासी मुंबई व्यतिरिक्त इतरत्र राहत आहेत अशा प्रवासांबाबतही दरराेज माहिती घेतली जात आहे.

काेविड सेंटर सुरु राहणार
काेविड केंद्रात सध्या रुग्णसंख्या कमी असली तरीही, हे केंद्र बंद करण्याचा निर्णय अद्याप पालिका प्रशासनाने घेतला नाही. काेविड केंद्रात सध्या रुग्ण नसल्याने इतर खर्च दरराेज हाेत आहे हा खर्च अनावश्यक असल्याचे बाेलले जात आहे.यावर अतिरिक्त आयुक्त सुरेश काकानी यांनी सांगितले की, सध्या रुग्णांची संख्या कमी असली तरीही, काेविडच्या नवीन स्ट्रेनमुळे अचानक रुग्ण संख्या वाढल्यास त्यावेळी काय करायचे? काेणतेही काेविड त्वरीत बंद हाेवू शकत पण ते सेंंटर उभे करण्यास बराच कालावधी निघून जाताे. रुग्णांची संख्या कमी आहे? पण भविष्यात रुग्णसंख्या वाढल्यास काय करायचे? काेविड सेंटर मधील कर्मचारी वर्ग आम्ही कार्यरत ठेवला आहे. मात्र बरेच खर्च आम्ही कमी केले आहेत. त्यामुळे काेविड सेंटर बंद करण्याची रिस्क आम्ही घेणार नाही असे काकानी यांनी सांगितले.