तळीरामांचे बजेट बिघडवणारा अर्थसंकल्प; टॅक्स वाढल्याने दारु महागली

एकच प्याला... महाग झाला... असं म्हणण्याची वेळ तळीरामांवर येमार आहे. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प तळीरामांचे बजेट बिघडवणारा आहे. टॅक्स वाढल्याने दारु महाग होणार आहे.

    मुंबई : एकच प्याला… महाग झाला… असं म्हणण्याची वेळ तळीरामांवर येमार आहे. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प तळीरामांचे बजेट बिघडवणारा आहे. टॅक्स वाढल्याने दारु महाग होणार आहे.

    राज्याचा 2021-22 या वर्षाचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2021) उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला. यावेळी सर्व प्रकारच्या मद्यावरील व्हॅटचा दर वाढल्याची घोषमा अजित पवारांनी केली.

    सर्व प्रकारच्या मद्यावरील व्हॅटचा दर ३५ टक्क्यांवरुन ४० टक्क्यांपर्यंत करण्यात आला आहे. देशी बनावटीच्या मद्याच्या उत्पादन शुल्कात निर्मिती मूल्याच्या २२० टक्के किंवा १८७ रुपये करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे मद्यावरील व्हॅटमध्ये ६० वरून ६५ टक्के इतकी वाढ करण्यात आली आहे.

    कोरोनाच्या संकटामुळे आणि अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी ही घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. दारूच्या किंमती वाढणार असून यामध्ये ५ टक्क्यांपर्यंतची वाढ होणार आहे. तसेच मद्यावरील मूल्यवर्धित करामध्ये सुद्धा वाढ करण्यात येणार आहे.

    कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आलं होतं. यामध्ये अनेक कारखाने, दुकाने आणि उद्योगधंदे बंद पडले होते. त्यामुळे राज्याची आर्थिक घडी प्रचंड प्रमाणात बिकट झाली होती. त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी प्रथम वाईन शॉप सुरू करण्यात आले होते. परंतु उपमुख्यमंत्र्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातून दारूच्या किंमती वाढल्या असून मद्यपींची नशा चांगलीच उतरणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.