Tax collection at Vashi Transport Office; Transport Minister Parab and Nitesh Rane had a heated argument

हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्याचे परिहवन मंत्री अनिल परब आणि भाजप आमदार नितेश राणे यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचे पहायला मिळाले. परिवहन मंत्री अनिल परब उत्तर देत असताना नितेश राणे हे मध्येच बोलले आणि त्यानंतर दोघांत वाकयुद्ध सुरू झाले(Tax collection at Vashi Transport Office; Transport Minister Parab and Nitesh Rane had a heated argument).

    मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्याचे परिहवन मंत्री अनिल परब आणि भाजप आमदार नितेश राणे यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचे पहायला मिळाले. परिवहन मंत्री अनिल परब उत्तर देत असताना नितेश राणे हे मध्येच बोलले आणि त्यानंतर दोघांत वाकयुद्ध सुरू झाले(Tax collection at Vashi Transport Office; Transport Minister Parab and Nitesh Rane had a heated argument).

    आधी तुमच्या जागेवर जा

    वाशी येथील परिवहन कार्यालयातील वाहनांचा कर वसूल करण्याबाबत भाजप आमदार मंगल प्रभात लोढा प्रश्न विचारला. त्यावर परिवहन मंत्री अनिल परब उत्तर देत होते. अनिल परब हे उत्तर देत असतानाच नितेश राणे हे मध्ये बोलले. यानंतर अनिल परब त्यांना म्हणाले, त्यांनी प्रश्न विचारला मी त्यांना उत्तर देतो. कर वसूल करण्यात आलेली रक्कम जमा करण्यात आली नसल्याचे मंगल प्रभात लोढा यांनी म्हटले. यावर अनिल परब म्हणाले, कुठल्याही रक्कमेचा अपहार झालेला नाही, असे म्हणताच नितेश राणे यांनी मध्ये बोलण्यास सुरुवात केली.

    यानंतर अनिल परब संतापले आणि, त्यांनी प्रश्न विचारला मी त्यांना उत्तर देतो. आपली वेळ येईल तेव्हा आपण प्रश्न विचारा. एक तर ते त्यांच्या जागेवर नाहीत. आधी तुमच्या जागेवर जा. यांची आसन व्यवस्था मला दाखवा. त्यांना त्यांच्या जागेवर पाठवा. परवानगी दिल्यावर प्रश्न विचारण्यासाठी उपस्थित करा असे ते म्हणाले. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी, आपण आसन क्रमांक सांगाव त्या आसनावर सदस्य बसतील. ९६ आसन क्रमांक आम्ही त्यांना दिला आहे. तुम्ही आम्हाला केवळ आसन अलॉट करुन देता आम्ही आमचे आसन ठरवतो.