शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

मतदारसंघातील कामे पेंडिग असतील सर्व ठिकाणी आम्हीच का?  मनपाची निवडणूक आहे तर मनपाच्या कर्मचाऱ्यांना घ्या खासगी अनुदानित शाळेतून शिक्षकच का? असा प्रश्न आम्ही विचारत आहोत. उलट यातील काही शिक्षक रिक्त जागेवर शाळेत जाण्यासाठी तयार असून ही दोन वर्षांपासून त्यांची सुटका होत नाही, उलट पडेल तिथे हवे ती कामे करून घेण्याची जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई उपनगरे यांची भूमिका अन्यायकारक आहे. यामुळं शिक्षकांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे धडक मोर्चा काढला.

    मुंबई : मुंबईतील अतिरिक्त शिक्षक २०१९ पासून रोज बी.एल ओ ड्युटी करत असून, रजा, प्रवास भत्ता, कोणत्याही सुविधा नसताना सतत काम सुरू असून, दिवाळी उन्हाळी सुट्टी, कोविड काळातही काम सुरू आहे. अत्यंत मेहनतीने आपल्याला दिलेले मतदारसंघातील कामे पूर्ण केल्यानंतर जिल्हा अधिकारी /मतदार नोंदणी अधिकारी यांनी कामे पूर्ण केलेल्या मतदार संघ बोरीवली व अंधेरी पूर्व येथून जिथे जिथे कमी तिथे शिक्षकांची रवानगी करण्यात येत असून, १०० शिक्षकांचे आदेश काढले आहेत.

    ही मनमानी असून उर्वरित मतदारसंघातील कामे पेंडिग असतील सर्व ठिकाणी आम्हीच का?  मनपाची निवडणूक आहे तर मनपाच्या कर्मचाऱ्यांना घ्या खासगी अनुदानित शाळेतुन शिक्षकच का? असा प्रश्न आम्ही विचारत आहोत. उलट यातील काही शिक्षक रिक्त जागेवर शाळेत जाण्यासाठी तयार असून ही दोन वर्षांपासून त्यांची सुटका होत नाही, उलट पडेल तिथे हवे ती कामे करून घेण्याची जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई उपनगरे यांची भूमिका अन्यायकारक आहे. यामुळं शिक्षकांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे धडक मोर्चा काढला.

    या सर्वं त्रासाला कंटाळून व होण्याऱ्या अन्यायातून सुटका व्हावी म्हणून, आपले मत मांडण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे गेलेल्या शिक्षकांची उलटपक्षी पोलिसांनी चौकशी केल्याने शिक्षकांनी संताप व्यक्त केला आहे. जिल्हाअधिकारी कार्यालयाची भूमिका योग्य नसून एका ठिकाणी चांगले व वेळेत काम केल्यावर शिक्षा मिळते का? असा प्रश्न शिक्षक विचारत आहेत. जे जिथे योग्य काम करत आहेत त्यांना करू द्या, ज्यांना शाळेत जायचे जाऊ द्या..२ वर्ष सतत राष्ट्रीय काम करणाऱ्या शिक्षकांवर जोर जबरदस्ती करू नये अशी विनंती शिक्षकांनी केली आहे. दरम्यान  शिक्षकांनी हे आदेश स्विकारले नसून, बदली ठिकाणी न जाण्याचा निर्णय घेतला आहे.