विसर्जनादिवशीच मुंबईत राडा; गृहमंत्र्यांनी मला अटक करण्याचा आदेश काढल्याचा किरीट सोमय्यांचा दावा

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीन यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्या(Kirit Somaiya) यांनी घोटाळ्याचे आरोप केले आहेत. यासाठी च सोमय्या 20 सप्टेंबर रोजी कोल्हापुर दौरा करणार आहेत. मात्र, हा दौरा रद्द व्हावा यासाठी गृहमंत्र्यांनी मला अटक करण्याचा आदेश काढल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. सोमय्या यांच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त पहायला मिळत आहे.

    मुंबई : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीन यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्या(Kirit Somaiya) यांनी घोटाळ्याचे आरोप केले आहेत. यासाठी च सोमय्या 20 सप्टेंबर रोजी कोल्हापुर दौरा करणार आहेत. मात्र, हा दौरा रद्द व्हावा यासाठी गृहमंत्र्यांनी मला अटक करण्याचा आदेश काढल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. सोमय्या यांच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त पहायला मिळत आहे.

    तर, दुसरीकडे मुश्रीफ समर्थकही आक्रमक झालेत. सोमय्या हे मुश्रीम यांच्या साखर कारखान्यावर जाणार आहेत. सोमय्या तुम्ही येवूनच दाखवा असा इशाराच मुश्रीफ सर्मथकांनी दिला आहे. यामुळे कोल्हापूरात सोमय्या विरूध्द मुश्रीफ समर्थकांचा सामना रंगणार आहे.
    माझा कोल्हापूर दौरा थांबविण्यासाठी, हसन मुश्रीफ घोटाळा दाबण्यासाठी माझ्या घराखाली पोलिसांनी गर्दी केली आहे. ही ठाकरे सरकारची गुंडगिरी आणि पोलीसांची दडपशाही असल्याचा दावा किरीट सौमय्या यांनी केला आहे.

    किरीट सोमय्या यांच्या बंगल्यासमोर पोलीस बंदोबस्त ठेवायला ते आतंकवादी आहेत का? असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला केला आहे. महाविकास आघाडीच्या दडपशाही, गुंड प्रवृत्तीला भाजप घाबरणार नाही. भाजप किरीट सोमय्या यांच्या पाठीशी असल्याचेही सोमय्या म्हणाले.