तुरुंगात जाईन, पण माफी मागणार नाही; विशेषाधिकार भंगप्रकरणी सुषमा अंधारे यांची भूमिका

नागपूर येथील राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विशेषाधिकार भंग प्रकरणी शिवसेना (उद्धव गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी तुरुंगात जाईन, पण माफी मागणार नाही, अशी भूमिका घेतली.

    मुंबई : नागपूर येथील राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विशेषाधिकार भंग प्रकरणी शिवसेना (उद्धव गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी तुरुंगात जाईन, पण माफी मागणार नाही, अशी भूमिका घेतली.

    हिवाळी अधिवेशनात महाभियोग चालविण्याचा प्रस्ताव दोन्ही सभागृहात आणण्यात आला. भाजपच्या नाशिक मध्य विधानसभेच्या आमदार देवयानी फरांदे यांनी अंधारे यांच्याविरोधात विधानसभेत हक्कभंगाचा ठराव मांडला आहे.

    त्यानंतर दुसऱ्याच दिवशी विधानपरिषदेत भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनीही अंधारे यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सुषमा अंधारे यांना आठ दिवसांची मुदत देऊन माफी मागण्याचे निर्देश दिले होते. मात्र, अंधारे यांनी आपण तुरुंगात जाण्यास तयार असल्याचे सांगत माफी मागण्यास नकार दिला.