‘यह क्या किया तुने’ नवाब मलिक यांनी केला समीर वानखेडे यांचा तो फोटो व्हायरल

मलिकांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये समीर वानखेडे आणि एक अन्य व्यक्ती दिसत आहे. प्रथमिक अंदाजानुसार वानखेडे यांच्या निकाहच्या वेळचा हा फोटो आहे. समीर वानखेडे मौलानासमोर सही करण्यासाठी बसलेले दिसत आहेत. या फोटोवर नवाब मलिक आज, सोमवारी अधिक स्पष्टीकरण देतील, अशी शक्यता असून त्यावर वानखेडे हे कोणते म्हणणे मांडतात हेसुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे.

    महाराष्ट्राचे अल्पसंख्याक कल्याण मंत्री नवाब मलिक यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर केलेल्या आरोपांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाहीय. आता नवाब मलिक यांनी वानखेडेंविरोधात मोठा फोटो ‘बॉम्ब’ फोडला आहे.

    नवाब मलिक यांनी आजही (22 नोव्हेंबर) आपल्या ट्विटर हँडलवर समीर वानखेडे यांचा आणखी एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो समीर वानखेडे यांच्या पहिल्या विवाहाच्या निकाहनाम्याचा असल्याचा मलिक यांचा दावा आहे.

    मलिकांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये समीर वानखेडे आणि एक अन्य व्यक्ती दिसत आहे. प्रथमिक अंदाजानुसार वानखेडे यांच्या निकाहच्या वेळचा हा फोटो आहे. समीर वानखेडे मौलानासमोर सही करण्यासाठी बसलेले दिसत आहेत. या फोटोवर नवाब मलिक आज, सोमवारी अधिक स्पष्टीकरण देतील, अशी शक्यता असून त्यावर वानखेडे हे कोणते म्हणणे मांडतात हेसुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे.

    दरम्यान, 3 ऑक्टोबरला एनसीबीने मुंबईत एका क्रूझ पार्टीवर छापा टाकून आर्यन खान आणि इतर अनेकांना अटक केली. सध्या आर्यन खान जामिनावर तुरुंगाबाहेर आहे. या प्रकरणानंतर नवाब मलिक हे समीर वानखेडेंवर सातत्याने हल्ले करत आहेत. वानखेडेंवर बॉलीवूडच्या लोकांना अडकवून खंडणी घेतल्याचा आरोपही मलिक यांनी  केला होता.