‘तो अधिकार तुम्हाला नाही’ मुंख्यमंत्री ठाकरेंनी राजपालांना शिकवली कर्तव्य

राज्यपाल महोदयांनी अभ्यासात अनावश्यक वेळ घालवू नये, कायदेशीर आहे की नाही हे तपासण्याच्या उद्योगात पडू नये. आपला हस्तक्षेप करण्याचा संबंधच नाही, असंही मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्रात म्हटलंय. मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना ठणकावत विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याबाबत सरकार आग्रही असल्याची भूमिकाही त्यांनी मांडली आहे. विधिमंडळ कायदे राज्यपालांच्या अधिकार कक्षेत येत नाही, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा करण्याची मागणीदेखील या पत्रातून केली आहे.

    मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यात वारंवार संघर्ष बघायला मिळतोय. विशेष म्हणजे यावेळी विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यात टोकाचा संघर्ष बघायला मिळतोय.

    राज्य सरकारने विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. पण भाजपने त्यावर आक्षेप घेतला. त्यानंतर आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी या निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेतला आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोनवेळा पत्र पाठवलं. पण राज्यपालांनी कायदेशीर गोष्टीचं कारण सांगत निवडणुकीला परवानगी नाकारली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना खरमरीत शब्दांत तिसरं पत्र पाठवलं आहे. त्यावर राज्यपालांची प्रतिक्रिया काय येते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

    राज्यपालांकडून सरकारच्या कायद्यांवर अविश्वास दाखवला, त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याच पत्रात निवडणूक घेण्याबाबत सरकार ठाम असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. कायदे मंडळाने काय कायदे केले, ते तपासण्याचा अधिकार राज्यपाल म्हणून तुम्हाला नाही, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकर यांनी ठणकावलंय.