ती व्होल्वो गाडी देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीयाची; राष्ट्रवादीचा आरोप

मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा तपास एटीएस करत आहे. या प्रकरणात एटीएसने एक व्होल्वो कार जप्त केली आहे. त्यावरून राष्ट्रवादीने संशयाची सुई थेट फडणवीस यांच्या निकटवर्तीयाकडे वळवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत फेसबूक पेजवरून यासंदर्भातील एक पोस्ट केली आहे.

  मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ मध्ये स्फोटकं सापडल्यानंतर राज्याचं राजकारण चांगलेचं तापले आहे. या प्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना NIA ने ताब्यात घेतले. यावरुन विरोध पक्ष महाविकास आघाडीवर आक्रमक झाले आहेत. पुढे या प्रकरणात वापरण्यात आलेल्या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांचा झालेला संशयास्पद मृत्यू आणि आता परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेला गंभीर आरोपामुळे राज्याच्या राजकारणात अनेक आरोप – प्रत्यारोप केले जात आहेत.

  मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा तपास एटीएस करत आहे. या प्रकरणात एटीएसने एक व्होल्वो कार जप्त केली आहे. त्यावरून राष्ट्रवादीने संशयाची सुई थेट फडणवीस यांच्या निकटवर्तीयाकडे वळवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत फेसबूक पेजवरून यासंदर्भातील एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, एटीएसने तपासादरम्यान जी व्होल्वो कार ताब्यात घेतली आहे ती बिल्डर मनिष भतिजा यांची असल्याचे समजते. मनिष भतिजा यांचे राजकीय व व्यावसायिक लागेबांधे भाजपा नेत्यांकडे जातात, असा संशय या पोस्टमधून व्यक्त करण्यात आला आहे.

  दरम्यान फडणवीस मुख्यमंत्री असताना मनिष भतिजा यांच्या पॅराडाइज ग्रुपला नवी मुंबई विमानतळानजीकची सोन्यासारखी २४ एकर प्राइम लँड पडेल भावाने दिली होती. इतका हा मनिष भतिजा फडणवीसांच्या जवळचा आहे आणि फडणवीसांचे अत्यंत लाडके ज्यांना त्यांचा ब्लू आइड बॉय म्हणून ओळखले जाते त्या प्रसाद लाड यांचे हे मनिष भतिजा व्यावसायिक पार्टनर असल्याचे समजते, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या अधिकृत फेसबूक पेजवरून केला आहे. नवी मुंबईतील सुमारे १७६७ कोटी रुपयांची ही जमीन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवघ्या ३.६ कोटी रुपयांत मनिष भतिजा यांच्या घशात घातली, असा आरोप सातत्याने झाला होता. त्यामुळे राजकीय क्षेत्रात मोठीचं खळबळ उडाली होती, असा दावाही राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला आहे.

   

  एटीएसच्या तपासामुळे कहानी में ट्विस्ट
  महाराष्ट्र एटीएसने जप्त केलेली व्होल्वो मनिष भतिजांची?
  मनिष भतिजा देवेंद्र…

  Nationalist Congress Party – NCP यांनी वर पोस्ट केले मंगळवार, २३ मार्च, २०२१