आता चर्चगेट ते विरारदरम्यान धीम्या मार्गावरही धावणार AC लोकल

विरार ते चर्चगेटदरम्यान एक, बोरिवली ते चर्चगेटदरम्यान दोन तसेच, गोरेगाव-चर्चगेट मार्गावर या लोकल फेऱ्या धावणार आहेत. डाउन मार्गावर चर्चगेट ते नालासोपारा मार्गावर एक, चर्चगेट ते बोरिवली मार्गावर दोन आणि चर्चगेट ते गोरेगावदरम्यान या एसी लोकल धावणार आहेत. चर्चगेट ते वांद्रे सकाळी 9.07 आणि वांद्रे ते चर्चगेट सकाळी 9.47 ची लोकल रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकूर यांनी दिली. या अतिरिक्त लोकल फेऱ्यांमुळे पश्चिम रेल्वेवरील एकूण वातानुकूलित लोकल फेऱ्यांची संख्या 20 आणि एकूण लोकल फेऱ्यांची संख्या 1373 वर पोहोचली आहे.

    चर्चगेट ते विरारदरम्यान आता धीम्या मार्गावरही लोकलने प्रवास करणाऱ्यां प्रवाशांसाठी वातानुकूलित लोकल सेवा देण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे.आहे. चर्चगेट ते विरारदरम्यान आता धीम्या मार्गावरही वातानुकूलित लोकलसेवा या मार्गावर नवीन 6 आणि बदली तत्त्वावर 2 अशा एकूण 8 लोकल फेऱ्या आजपासून या प्रवासी सेवेत दाखल होणार आहेत.

    विरार ते चर्चगेटदरम्यान एक, बोरिवली ते चर्चगेटदरम्यान दोन तसेच, गोरेगाव-चर्चगेट मार्गावर या लोकल फेऱ्या धावणार आहेत. डाउन मार्गावर चर्चगेट ते नालासोपारा मार्गावर एक, चर्चगेट ते बोरिवली मार्गावर दोन आणि चर्चगेट ते गोरेगावदरम्यान या एसी लोकल धावणार आहेत.

    चर्चगेट ते वांद्रे सकाळी 9.07 आणि वांद्रे ते चर्चगेट सकाळी 9.47 ची लोकल रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकूर यांनी दिली. या अतिरिक्त लोकल फेऱ्यांमुळे पश्चिम रेल्वेवरील एकूण वातानुकूलित लोकल फेऱ्यांची संख्या 20 आणि एकूण लोकल फेऱ्यांची संख्या 1373 वर पोहोचली आहे. मध्य रेल्वेवर दोन वातानुकूलित लोकलच्या माध्यमातून एकूण 26 लोकल फेऱ्या चालवण्यात येत आहेत. मात्र, वातानुकूलित लोकल फेऱ्यांचे तिकीट जास्त असल्याने प्रवाशांचा त्यास फारसा प्रतिसाद दिसत नाहीये.