अनिल देशमुख यांचा राजीनामा घेत नाहीत तोपर्यत आंदोलन सुरु राहणार: देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण

मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझे यांना दिलं होतं, असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी केला.

    मुंबई (Mumbai).  पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंग (Prambir Singh) यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझे यांना दिलं होतं, असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी केला.

    परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना याबाबत पत्र लिहिलं आहे. जेवढ्या गाड्या जप्त झाल्या त्या गाड्या कोण कोण वापरत होत याची सुद्धा चौकशी केली पाहिजे. भाजपने आज पासून आंदोलन सुरू केलं ते आंदोलन जो पर्यंत या प्रकरणाची चौकशी होत नाही आणि गृहमंत्र्यांच्या राजीनामा होत नाही तो पर्यंत सुरू राहील, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

    परमबीर सिंह यांची बदली करण्यात आल्यानंतर अस्वस्थ असलेल्या सिंह यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांची तक्रार केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये एकट खळबळ माजली आहे. आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या प्रकरणावर काय निर्णय घेणार याकडे सर्व राज्याचं लक्ष लागलं आहे.