The biggest income tax evasion in the country till date! Take Rs 52 crore in tax and refund the rest; Perfume trader Piyush Jain's demand in court

उत्तर प्रदेशातील अत्तर व्यापारी पुष्पराज जैन प्रकरणाचा सुगंध मुंबईपर्यंत पसरला आहे. अत्तर व्यापारी पीयूष जैननंतर प्राप्तीकर विभागाने शुक्रवारी मुंबई ते कन्नौजपर्यंत तब्बल 50 ठिकाणी छापेमारी केली. मुंबईत एकूण 14 ठिकाणी आयकर अधिकाऱ्यांनी छापा टाकला. या मध्ये 8 व्यवसायिक आणि 6 निवासी ठिकाणांचा समावेश आहे(The biggest income tax raid in the country till date! The fragrance of Pushparaj's perfume in Mumbai too; Income tax department raids at 14 places).

  मुंबई : उत्तर प्रदेशातील अत्तर व्यापारी पुष्पराज जैन प्रकरणाचा सुगंध मुंबईपर्यंत पसरला आहे. अत्तर व्यापारी पीयूष जैननंतर प्राप्तीकर विभागाने शुक्रवारी मुंबई ते कन्नौजपर्यंत तब्बल 50 ठिकाणी छापेमारी केली. मुंबईत एकूण 14 ठिकाणी आयकर अधिकाऱ्यांनी छापा टाकला. या मध्ये 8 व्यवसायिक आणि 6 निवासी ठिकाणांचा समावेश आहे(The biggest income tax raid in the country till date! The fragrance of Pushparaj’s perfume in Mumbai too; Income tax department raids at 14 places).

  दरम्यान, पुष्पराज यांच्या मुंबई येथील चार बँकेच्या खात्यांची चौकशी केली जात आहे. त्यांचे हे चारही खाते एसबीआय (बोरीवली) येथील आहेत. याव्यतिरिक्त एक खासगी बँक आणि एसबीआय (कन्नोज) येथे ब्रँचमध्ये पम्मी जैन यांच्याशी संबंधित एक चालू खाते आणि चार बचत खात्यांसह एकूण सहा खात्यांची चौकशी केली जात आहे.

  जीएसटी पथकासह कारवाई

  पीयूष जैनच्या कानपूर आणि कन्नौजमधील घरातून कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली. त्यानंतर समाजवादी पक्षाचे आमदार पुष्पराज उर्फ पम्मी जैन यांच्या घरावर आयकर आणि जीएसटी पथकांनी छापे टाकले आहेत. शुक्रवारी पहाटे आमदार पुष्पराज जैन यांच्या अनेक ठिकाणी आयकर आणि जीएसटी पथक दाखल झाले आहेत. पुष्पराज यांच्या कन्नौजच्या घरासह त्यांच्या नोएडा, कानपूर, हाथरस आणि मुंबईसह अनेक ठिकाणांवर आयकर विभागाकडून छापे टाकण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

  कर चोरीचा आरोप

  सकाळी सात वाजल्यापासून आयकर विभागाचे 150 अधिकारी पुष्पराज यांच्या 50 वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकत आहेत. छाप्यात काय सापडले? याची माहिती अद्याप मिळालेली नाही. प्राथमिक माहितीनुसार, टॅक्स चोरीच्या आरोपावरून हा छापा टाकण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पुष्पराज जैन यांच्या व्यतिरिक्त आयकर अधिकाऱ्यांनी कन्नोजमधील आणखी एका परफ्यूम व्यापारी मोहम्मद याकूब यांच्याही ठिकाणी छापा टाकत आहेत.

   

  हे सुद्धा वाचा