
मुंबईत तसेच राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोन वेळा कोरोना चाचणी करावी लागणार आहे. अधिवेशन दहा दिवस होत असल्यामुळे दोन वेळा कोरोना चाचणी होणार आहे.पाच दिवस कामकाज झाल्यानंतर पुन्हा एकदा कोरोना चाचणी होणार आहे.
मुंबई : राज्यात १ मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात होणार आहे. विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन यंदा दहा दिवस होणार आहे. १ ते १० मार्च असे दहा दिवस अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी असेल. ८ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार असून ९ आणि १० मार्च रोजी बजेटवर चर्चा होणार आहे.
मुंबईत तसेच राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोन वेळा कोरोना चाचणी करावी लागणार आहे. अधिवेशन दहा दिवस होत असल्यामुळे दोन वेळा कोरोना चाचणी होणार आहे.पाच दिवस कामकाज झाल्यानंतर पुन्हा एकदा कोरोना चाचणी होणार आहे. ८ मार्च ते १० मार्च कामकाजासाठी सहा आणि सात मार्च रोजी दुसरी कोरोना चाचणी होणार आहे, अशी माहिती मिळाली आहे.