संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

आरोग्य विभागाच्या ६ हजार २०५ पदांसाठी लेखी परीक्षा २५ आणि २६सप्टेंबर रोजी होणार होती. मात्र आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी ती रद्द झाल्याची घोषणा परीक्षेच्या १२तास आधी केली. त्यानंतर आता नवीन वेगवेगळ्या तारखा जाहीर करण्यात आलया असून त्यातील तारीख निश्चित झाली नाहीये.

    मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने गट-क आणि गट-ड साठी होणाऱ्या परीक्षा ऐनवेळी रद्द करण्यात आल्या होत्या. परीक्षेच्या १२ तासांआधी परीक्षा रद्द झाल्याची घोषणा करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली होती. यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी लवकरच परीक्षेच्या तारखा जाहीर करू असे म्हटले होते. त्यानुसार आरोग्य विभागाच्या परीक्षेची तारीख जाहीर केली आहे.

    राजेश टोपेंनी दिलेल्या माहितीनुसार आरोग्य विभागाच्या पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षा १५,१६नाही तर२२,२३ ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे. तारीख निश्चित करण्यासाठी आरोग्य विभाग आणि न्यासाचे प्रमुख यांच्यासोबत बैठक घेण्यात येईल, अशी माहिती टोपेंनी दिली आहे.

    ‘न्यासा’ संस्थाने तयारीसाठी थोडा वेळ हवा असल्याचं कारण सांगून परीक्षा पुढे ढकलण्यात आली. ही संस्था फडणवीसांच्या काळात निवडण्यात आली होती. न्यासाने घेतलेल्या निर्णयाची घोषणा राजेश टोपेंनी परीक्षेच्या१२ तास आधी केली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.

    दरम्यान, आरोग्य विभागाच्या ६ हजार २०५ पदांसाठी लेखी परीक्षा २५ आणि २६सप्टेंबर रोजी होणार होती. मात्र आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी ती रद्द झाल्याची घोषणा परीक्षेच्या १२तास आधी केली. त्यानंतर आता नवीन वेगवेगळ्या तारखा जाहीर करण्यात आलया असून त्यातील तारीख निश्चित झाली नाहीये.