वर्ध्यातील भीषण अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना २ लाखांची तर जखमींना ५० हजारांची केंद्राकडून मदत करणार, पंतप्रधान मोदींची घोषणा

अपघातामध्ये सात मेडिकलच्या विद्यार्थ्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. यामध्ये महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, बिहार, ओडिसामधील विद्यार्थ्यांचा समावेश होता. तसेच या मृतांमध्ये भाजपचे आमदार विजय रहांगडाले यांचा सुपुत्र अविष्कार रहांगडालेचा समावेश होता. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांचा कुटुंबियांना प्रत्येकी २ लाखांची आणि जखमींसाठी ५० हजारांची मदत जाहीर केली आहे. केंद्राकडून मदत केली जाणार असल्याचं मोदींनी टिव्ट करत माहिती दिली आहे.

    वर्धा : चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे सोमवारी मध्यरात्री चारचाकीचा एसयुव्हीचा (SUV Car) वर्धा जिल्ह्यातील सेलसुरा येथे भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये सात मेडिकलच्या विद्यार्थ्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. यामध्ये महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, बिहार, ओडिसामधील विद्यार्थ्यांचा समावेश होता. तसेच या मृतांमध्ये भाजपचे आमदार विजय रहांगडाले यांचा सुपुत्र अविष्कार रहांगडालेचा समावेश होता. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांचा कुटुंबियांना प्रत्येकी २ लाखांची आणि जखमींसाठी ५० हजारांची मदत जाहीर केली आहे. केंद्राकडून मदत केली जाणार असल्याचं मोदींनी टिव्ट करत माहिती दिली आहे.

    वर्ध्यात झालेल्या या भीषण अपघाताबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले असून मृतांच्या कुटुंबियांसोबत आपण असल्याचे सांगितले. तर जखमी लोकं लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. तर विविध क्षेतातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

    दरम्यान, रविवारी शिक्रापूर येथील अपघाताची घटना ताजी असताना, वर्धा येथे अपघाताची मोठी घटना घडली आहे. महाराष्ट्रान भावी डॉक्टर गमवल्याची भावना राज्यातून येत आहे. तसेच या अपघातात भाजपाचे आमदार विजय राहांगडाले यांचा एकुलता एक मुलगा आविष्कार रहांगडाले यांचाही समावेश आहे. यात आविष्कारचा सुद्धा मृत्यू झाला आहे.