
महाविकास आघाडी सरकारने निश्चय केलेला आहे की गुजरातला पळवण्याचा प्रयत्न झालेले आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र हे आम्ही मुंबईलाच करणार अशी घोषणा करतानाच उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी त्या बाबतचा आपला दृढ निश्चय व्यक्त केला. मंत्रालयात प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना देसाई म्हणाले की खरेतर मुंबई हेच भारतातील जागतिक वित्तीय केंद्रसाठी अत्यंत योग्य ठिकाण आहे यावर जगाने शिक्कामोर्तब केले आहे. पण पाच वर्षांपूर्वी मुंबईचे हे केंद्र गुजराथने पळवले व तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी त्या बाबतीत काहीही केले नाही(The central government will have to bow down; The Maha Vikas Aghadi government will set up an international financial center in Mumbai).
मुंबई : महाविकास आघाडी सरकारने निश्चय केलेला आहे की गुजरातला पळवण्याचा प्रयत्न झालेले आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र हे आम्ही मुंबईलाच करणार अशी घोषणा करतानाच उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी त्या बाबतचा आपला दृढ निश्चय व्यक्त केला. मंत्रालयात प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना देसाई म्हणाले की खरेतर मुंबई हेच भारतातील जागतिक वित्तीय केंद्रसाठी अत्यंत योग्य ठिकाण आहे यावर जगाने शिक्कामोर्तब केले आहे. पण पाच वर्षांपूर्वी मुंबईचे हे केंद्र गुजराथने पळवले व तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी त्या बाबतीत काहीही केले नाही(The central government will have to bow down; The Maha Vikas Aghadi government will set up an international financial center in Mumbai).
आम्ही त्या वेळी पुष्कळ सांगत होतो की केंद्राशी बोला हे केंद्र जाता कामा नये, पण गुजराथ इंटरनॅशनल फिनान्सिअल टेक गिफ्ट सिटी या नावाने गुजराथने गांधीनगरला एक प्रकल्प सुरु केला तिथे ते केंद्र हलवण्याचे प्रयत्न केंद्र सरकारने केले. पण आता पाच वर्षे उलटली तरी ते केंद्र आकार घेत नाही. कारण जागतिक स्तरावर गांधीनगरला नव्हे तर मुंबईलाच हे केंद्र होऊ शकते अशी मान्यता आहे.
देसाई म्हणाले की गंमत म्हणजे मी स्वतः गुजराथमध्ये गेलो असताना पाहिले आहे की त्या गिफ्टच्या जाहिरात फलकवारही निअर मुंबई असे चक्क लिहिले आहे. मी तिथल्या अधिकाऱ्यांना खडसावले की हा काय प्रकार हे तेंव्हा ते म्हणाले की “मुंबईचा उल्लेख नसेल तर इथे कोण येणार ?” त्यांचे म्हणणे असे की मुंबईच्या जवळच आहे हे केंद्र. सहारपासून विमानाने तासाभराचे अंतर आहे. मुंबईचा उल्लेख केल्याशिवाय या केंद्राला वजनच प्राप्त होत नाही असा गुजराथचा अनुभव आहे. असे ते सुरु न होऊ शकणारे केंद्र मुंईतच आम्ही आणणार आहोत.
या सदंर्भात केंद्र सरकार मान्यता देईल का असे विचारले असता उद्योगमंत्री म्हणाले की केंद्र सरकार अनेक बाबतीत माघार घेतेच आहे. याही बाबतीत त्यांना माघार घ्यावी लागेल.
आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र – इंटरनॅशनल फिनान्सिअल सेंटर – मध्ये जागतिक शेअर तसेच रोखे व्यवहार आणि वित्तीय देवाण घेवाणींचे – सेटलमेंटचे – व्यवहार होत असतात. अक्षांश रेखांशांच्या मांडणीमध्ये न्यूयॉर्क, टोकिओ सिंगापोर व मुंबई यांच्यात वेळेचे अंतर नेमके एकसारखे आहे. म्हणूनच आंतररा,टरीय वित्तीय व्यवहारांसाठी मुंबईच सोईचे ठरते.
रिझर्व बँके, स्टेट बँकेची मुख्यालये मुंबईत आहेत, अनेक मोठ्या भारतीय बँकांची तसेच वित्तीय संस्थांची मुख्यालये मुंबईतच आहेत. मग आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र हे गुजराथमध्ये कसे काय जाऊ शकते ? महा विकास आघाडीने आता ठरवले आहे की हे केंद्र आम्ही मुंबईतच साकार करू. त्यासाठी बीकेसीत मोठी जागा राखीव ठेवलेली होती. पण नेमके तिथेच केंद्र सरकारने बुलेट ट्रेनचे टर्मीनस करण्याचा घाट घातला व मागील सरकारने तो मान्यही केला असे सांगून श्री देसाई म्हणाले की आम्ही काहीही करू. जागा कुठूनही पैदा करू. पण हे वित्तीय केंद्र आता मुंबईतच होणार हे नक्की. या प्रकल्पासाठी भारतीय तसेच जागतिक तज्ज्ञांची मदत घेतली जात अस्लायचेही देसाई म्हणाले.
आशीष शेलारांना उत्तर
भाजपा नेते आशीष शेलार यांनी आदित्य ठाकरे व ममता बॅनर्जींच्या गुप्त भेटीचा हवाला देऊन असा आरोप केला आहे की आघाडी सरकार मुंबईतील उद्योगधंदे बंगालला घेऊन जाण्यासाठी ममतांना मदत करत आहे. हा आरोप साफ फेटाळून लावताना उद्योगमंत्री म्हणाले की देशातील कोणत्याही राज्यांचे मुख्यमंत्री उद्योजकांना विनंती करायला मुंबईत येतात. काल ममता आल्या होत्या. आज गुजराथचे मुख्यमंत्री आले आहेत. तर मध्यंतरी युपीचे आदित्यनाथ आले होते आशीष शेलारांनी भाजपाच्या मुख्यमंत्र्यांनाही सांगावे की इथले उद्योग नेण्याचा प्रयत्न करु नका.
आम्ही देशाच्या अन्य राज्यांमधून उद्योजकांना बोलावत नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्रात गुतंवणूक यावी यासाठी धडपड करतो असे सांगून देसाई म्हणाले की अलिकडेच दुबई एक्सपोमध्ये आम्ही महाराष्ट्राचे दालन सुरु केले. तिथे तीन दिवस मुक्कम केला. त्यात 26 ब्डाय उद्योगांबरोबर करारही केले. आता राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये पंधरा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक येणार असून त्यातून महाराष्ट्रात तीस हजार नवे रोजगार तयार होतील. आशीष शेलारांनी फुकाची टीका न करता राज्यात अधिक उद्योग येण्यासाठी सूचना दिल्या तर स्वागतच करू असेही देसाई म्हणाले.
भाजपाची खरी पोटदुखी
ममता बॅनर्जी महाराष्ट्रात आल्या त्यांनी शिवनसेना नेत्यां बरोबर राजकीय चर्चा केली हीच खरी भाजपाची पोटदुखी आहे, असे सांगून देसाई म्हणाले की शिवसेना हा प्रबळ प्रादेशिक पक्ष आहे ममतांचाही पक्ष प्रबळ आहे त्यांनी बंगालमध्ये भाजपाला धूळ चारली. तोच प्रयोग देशस्तरावर आम्ही सारे मिळून करू लागलो तर भाजपा फारच मागे ढकलला जाईल याची भीती असल्यानेच भाजपा नेत्यांची पोटदुखी सुरु आहे असाही टोला सुभाष देसाई यांनी लगावला.