औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्याचा ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर; पुण्यातील तालुक्यांचीही नावे बदलणार 

गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण करण्यासाठी मागणी शिवसेनेतर्फे केली जात आहे. औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत औरंगाबाद शहराचे संभाजीनगर असे नामांतर करावे असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. तर, पुण्यातील तालुक्यांचीही नावे बदलण्याचा प्रस्ताव आहे( The decision to name Aurangabad city Sambhajinagar was approved in the general meeting of Zilla Parishad; The names of talukas in Pune will also be changed).

  मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण करण्यासाठी मागणी शिवसेनेतर्फे केली जात आहे. औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत औरंगाबाद शहराचे संभाजीनगर असे नामांतर करावे असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. तर, पुण्यातील तालुक्यांचीही नावे बदलण्याचाही प्रस्ताव आहे( The decision to name Aurangabad city Sambhajinagar was approved in the general meeting of Zilla Parishad; The names of talukas in Pune will also be changed).

  भाजपाच्या सदस्यांनी हा ठराव मांडला आणि त्याला शिवसेनेच्या पदाधिकारी, सदस्यांनी अनुमोदन दिले. जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा अध्यक्ष मीना शेळके यांच्या अध्यक्षतेखाली मौलाना अबुल कलाम आझाद रिसर्च सेंटर येथे पार पडली. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण करण्याचा मुद्दा पुन्हा एकदा उफाळून येण्याची चिन्हे आहेत.

  2009 मध्येही पारित झाला होता ठराव

  2009 साली झालेल्या सर्वसाधारण सभेत तत्कालीन सदस्यांनी संभाजीनगर नामांतर करण्याचा ठराव घेतला होता. जुना ठराव प्रलंबित असताना पुन्हा सर्व सभासदांनी याच विषयावर ठराव मंजूर केला. या सभेत औरंगाबादचे नाव हे संभाजीनगर करावे, असा ठराव भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य मधुकर वातुरे यांनी मांडला होता.

  शिवसेना-भाजपामध्ये वाक्‌युद्ध रंगणार

  मराठवाड्याचे दोन केंद्रीय मंत्री असल्यामुळे त्यांनी हा प्रस्ताव मंजूर करून घ्यावा, असा टोमणा शिवसेनेचे बांधकाम सभापती किशोर बलांडे यांनी लगावला. त्यामुळे औरंगाबाद की संभाजीनगर नावावरून शिवसेना आणि भाजपमध्ये वाक्‌युद्ध सुरू होणार असे दिसते. औरंगाबाद जिल्हा परिषदेची मुदत फेब्रुवारीमध्ये समाप्त होणार आहे. त्यानुषंगाने जिल्हा परिषद मार्फत विविध प्रलंबित कामे तसेच निधी नियोजनाच्या विषय सभा संपन्न झाली. त्यात औरंगाबाद की संभाजीनगर याच मुद्यावर अधिक चर्चा झाली. त्यामुळे आता पुन्हा निवडणुकीच्या तोंडावर महानगरपालिका सोबतच जिल्हा परिषदेमध्ये औरंगाबाद की संभाजीनगर हा मुद्दा गाजणार जवळपास स्पष्ट दिसत आहे.

  पुण्यातील तालुक्यांचीही नावे बदलणार

  पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नाव पुन्हा एकदा राजगड करावे आणि मावळ तालुक्यातील मळवली रेल्वे स्टेशनला कार्ला येथील एकवीरा देवीचे नाव देण्यात यावे, अशा आशयाचे नाव बदलाचे दोन स्वतंत्र ठराव पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आले. हे दोन्ही ठराव पुढील मंजुरीसाठी अनुक्रमे राज्य आणि केंद्र सरकारकडे पाठविण्यात येतील, अशी घोषणा जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी यावेळी सभागृहात केली. वेल्हे तालुक्याचे नाव बदलण्याबाबतचा ठराव उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी मांडला. राजा शिवाजी ग्रामीण विकास मंडळाने याबाबतची मागणी शिवतरे यांच्याकडे केली होती. सर्वपक्षीय जिल्हा परिषद सदस्यांनी या ठरावास एकमुखी पाठिंबा दिला. त्यानंतर एकमताने हा ठराव मंजूर केला.