Finally reservation for Maratha community, opposition of MP Sambhaji Raje

राज्य सेवा आयोगाची परिक्षा देण्यासाठी मर्यादा लागू करण्यात आली आहे. खुल्या गटातून ६ तर ओबीसी (OBC) गटातून फक्त ९ वेळाच या परीक्षा देता येणार आहेत. हा निर्णय मराठा समाजातील विद्यार्थ्यांवर अन्यायकारक असल्याचा आरोप मराठा समाजाच्या संघटनांनी केला आहे. मराठा संघटनांनी या निर्णयाचा कडाडून विरोध केला आहे.

मुंबई : स्पर्धा परिक्षांमध्ये बसणाऱ्या उमेदवारांचे प्रयत्न अथवा संधीची संख्या मर्यादित करण्याचा निर्णय MPSC आयोगाने घेतला आहे. खुल्या आणि ओबीसी गटाला ही मर्यादा लागू करण्यात आली आहे. या निर्णयाला मराठा समाजाच्या संघटनांनी विरोध केला आहे.

यापुढे आता UPSC प्रमाणेच आता राज्य सेवा आयोगाची परिक्षा देण्यासाठी मर्यादा लागू करण्यात आली आहे. खुल्या गटातून ६ तर ओबीसी (OBC) गटातून फक्त ९ वेळाच या परीक्षा देता येणार आहेत. २०२१ पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. अनुसुचित जमाती आणि अनुसुचित जाती प्रवर्गातील उमेदवारांस कमाल संधीची मर्यादा लागू राहणार नाही.

हा निर्णय मराठा समाजातील विद्यार्थ्यांवर अन्यायकारक असल्याचा आरोप मराठा समाजाच्या संघटनांनी केला आहे. मराठा संघटनांनी या निर्णयाचा कडाडून विरोध केला आहे.

EWS चे समर्थन करणाऱ्यांनी उत्तर द्यावे. MPSC चे ७ पैकी ३ सदस्य कसे निर्णय घेऊ शकतात. SEBC चा उल्लेख असणे आवश्यक होते. मराठा आरक्षणाची याचिका ही सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यामुळे न्यायालय काय निर्णय देते तोपर्यंत थांबले पाहिजे, अशी मागणीमराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक धनंजय जाधव यांनी केली आहे.