सिवूडमध्ये इमारतीची गॅलरी कोसळली, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

नवी मुंबई विकसित झाल्यावर सिडको इमारती उभारून सुनियोजित शहराचा शिक्का सिडकोने नवी मुंबईवर मारला होता. मात्र हळूहळू या इमारतींमधील गोम ससमोर येत गेली. तकलादू बांधकामांची उदाहरणे ससमोर येऊ लागली आहेत. घराच्या छताचे प्लॅस्टर कोसळणे, भिंतीचे प्लॅस्टर कोसळणे या घटना सामान्य झाल्या आहेत. अशात नेरुळ येथील इमारतीचा जिना कोसळण्याची घटना काही वर्षांपूर्वी घडली होती.

    सिद्धेश प्रधान नवी मुंबई – सिवूड सेक्टर ४६ मधील सिडकोच्या मानसरोवर सोसायटीत एका इमारतीचा सज्जा कोसाळण्याची घटना बुधवारी सकाळी घडली. या घटनेत सज्जाखाली पार्क केलेल्या दुचाकीचे मोठे नुकसान झाले असून; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हा सज्जा पडल्यावर त्या आवाजाने आहव नागरिक धावत आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. यावेळी सिडकोच्या अधिकाऱ्यांनी येऊन पाहणी केली. त्यामुळे पुन्हा एकदा सिडको इमारतींचा व त्यांच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

    नवी मुंबई विकसित झाल्यावर सिडको इमारती उभारून सुनियोजित शहराचा शिक्का सिडकोने नवी मुंबईवर मारला होता. मात्र हळूहळू या इमारतींमधील गोम ससमोर येत गेली. तकलादू बांधकामांची उदाहरणे ससमोर येऊ लागली आहेत. घराच्या छताचे प्लॅस्टर कोसळणे, भिंतीचे प्लॅस्टर कोसळणे या घटना सामान्य झाल्या आहेत. अशात नेरुळ येथील इमारतीचा जिना कोसळण्याची घटना काही वर्षांपूर्वी घडली होती.

    त्यानंतर थेट बुधवारी सकाळी सिवूड येथील सिडको इमारतीचा सज्जा कोसळण्याची घटना घडली. या इमारतीची अंतर्गत परिस्थिती देखील तितकीच खराब असून सर्वत्र तडे गेल्याचे पाहायला मिळत आहे. कोसळलेल्या सज्जाचा वरील मजल्यावरील भागाला देखील तडे गेले असून हा भाग देखील कधीही कोसळण्याची शक्यता आहे. यात कोणालाही दुखापत झालेली नसली तरी रहिवाशी जीव मुठीत घेऊन जगत आहेत.

    या दुर्घटनेनंतर आता या इमातींचे प्लॅस्टर सिडकोने दुरुस्त करून द्यावे अशी मागणी वाढत आहे.  त्याबाबत सर्वपक्षीयांनी वारंवार आवाज उठवला आहे. सिवूडस येथे जवळपास ३२ गृह निर्माण सोसायट्यांमध्ये २५० पेक्षा जास्त सिडकोच्या इमारती आहेत. यात हजारो नागरिक वास्तव्यास आहेत. मात्र सोडकोने बांधलेल्या इमारती कालांतराने निकृष्ट दर्जाच्या ठरू लागल्याने घरांचे व इमारतींच्या बाह्य व अंतर्भागाचे प्लॅस्टर कोसळ्यास  सुरुवात झाली आहे. यात काही जण किरकोळ जखमी झाल्याचे निदर्शनास आले आहे.