रात्रीच्या वेळेस बस भर रस्त्यात सोडून ड्रायव्हर फरार… कोकणातुन मुबंईत येणाऱ्या प्रवाशांनी घेतला थरारक अनुभव

गणेशोत्सवासाठी कोकणात गेलेले चाकरमानी सध्या परतीच्या प्रवासात आहेत. कोकणातुन मुबंईत येणाऱ्या प्रवाशांना एक थरारक अनुभव आला. रात्रीच्या वेळेस बस भर रस्त्यात सोडून ड्रायव्हर फरार झाल्याने प्रवासी चांगलेच गोंधळले.

    मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात गेलेले चाकरमानी सध्या परतीच्या प्रवासात आहेत. कोकणातुन मुबंईत येणाऱ्या प्रवाशांना एक थरारक अनुभव आला. रात्रीच्या वेळेस बस भर रस्त्यात सोडून ड्रायव्हर फरार झाल्याने प्रवासी चांगलेच गोंधळले.

    शुक्रवारी सायंकाळी सिंधुदुर्गच्या बांदा येथून एक खासगी बस प्रवासी घेऊन मुंबईकडे निघाली होती. मध्यरात्री चिपळूण जवळील वालोपे येथे पोहोचताच चालकाने बस महामार्गावर एका बाजूला उभी केली. बस बराच वेळ एकाच जागी थांबून राहिल्याने प्रवाशांना अचानक जाग आली.

    यावेळी बसचा चालक गायब असल्याचे प्रवाशांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी बसमालकाशी संपर्क साधून पर्यायी चालक उपलब्ध करुन दिला. यानंतर ही बस मुंबईकडे रवाना झाली. मात्र विचित्र अनुभवामुळे प्रवाशी चांगलेच गोंधळले होते.