The fact that the magazine does not match cannot be a reason to break the marriage vow; The accused was taken to court by the High Court

बदलापूर येथे राहणाऱ्या आरोपी अविशेक मित्राचे (३३) बोरीवलीतील महिलेशी प्रेमसंबंध होते. ते दोघेही पंचतारांकित हॉटेलमध्ये २०१२ पासून काम करत होते. दरम्यान, मित्राने महिलेला लग्नाचे खोटे आश्वासन देऊन तिच्याशी शारिरीक संबंध प्रस्थापित केले. पुढे ती गर्भवती राहिल्यानंतर मित्राने लग्नाचे पुन्हा वचन देऊन तिला गर्भपात करण्यास भाग पाडले. त्यांनतर आरोपीने तिला टाळाटाळ करण्यास सुरुवात केली म्हणून २८ डिसेंबर २०१२ रोजी पिडित महिलेने बोरीवली पोलिसांत फसवणूक आणि बलात्कार करून शारिरीक आणि मानसिक शोषण केल्यातंर्गत तक्रार दाखल केली.

    मुंबई : लग्नाचे अमिष दाखवून महिलेशी शारीरिक संबंध ठेऊन त्यानंतर शब्द फिरविणाऱ्या आरोपीला दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. पत्रिका जुळत नाही हे लग्नाचे वचन मोडण्याचे कारण असू शकत नाही, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने आरोपीची आरोपातून मुक्तता करण्याची मागणी कऱणारी याचिका फेटाळून लावली.

    बदलापूर येथे राहणाऱ्या आरोपी अविशेक मित्राचे (३३) बोरीवलीतील महिलेशी प्रेमसंबंध होते. ते दोघेही पंचतारांकित हॉटेलमध्ये २०१२ पासून काम करत होते. दरम्यान, मित्राने महिलेला लग्नाचे खोटे आश्वासन देऊन तिच्याशी शारिरीक संबंध प्रस्थापित केले. पुढे ती गर्भवती राहिल्यानंतर मित्राने लग्नाचे पुन्हा वचन देऊन तिला गर्भपात करण्यास भाग पाडले. त्यांनतर आरोपीने तिला टाळाटाळ करण्यास सुरुवात केली म्हणून २८ डिसेंबर २०१२ रोजी पिडित महिलेने बोरीवली पोलिसांत फसवणूक आणि बलात्कार करून शारिरीक आणि मानसिक शोषण केल्यातंर्गत तक्रार दाखल केली.

    तेव्हा, दोघांनाही एकत्र बोलवून बोरीवली पोलिसांनी ४ जानेवारी २०१३ रोजी समुपदेशनासाठी पाठवले. तेव्हा आऱोपींने घरच्यांसमोर लग्नाची तयारी दर्शवली त्यामुळे तक्रारदार महिलेने तक्रार मागे घेतली. मात्र, १८ जानेवारी रोजी अविशेकने आपण लग्न करणार नसल्याचे समुपदेशकाला कळविले. अखेरीस पिडितेने नव्याने तक्रार दाखल केली. त्याची दखल घेत पोलिसांनी गुन्हाची नोंद करत आरोपीविरोधात आरोपपत्रही दाखल केले. बलात्काराच्या आऱोपातून मुक्तता कऱण्यात यावी, यासाठी अविशेकने दिंडोशी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला. मात्र, अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी तो अर्ज फेटाळून लावला. त्याविरोधात अविशेकने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

    शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर आरोपीला लग्न करण्याचा कोणताही हेतून नव्हता अथवा त्याने पिडितेला खोटे वचन दिले होते असे कुठेही म्हटलेले नाही. त्या दोघांची पत्रिका जुळत नसल्याने त्याने लग्नाचे वचन मोडले असे म्हटले जाऊ शकते. त्यामुळे हे प्रकरण फसवणूक आणि बलात्काराचे नसून वचनभंगाचे असल्याचा युक्तिवाद आरोपीच्यावतीने कऱण्यात आला. सदर याचिकेवर न्या. संदीप शिंदे यांच्यासमोर सुनावणी पार पडली. त्याच्या आदेशाची प्रत मंगळवारी जाहीर करण्यात आली.

    त्यानुसार, तक्रारदार महिलेला दिलेले लग्नाचे वचन पाळण्याचा आरोपीचा सुरुवातीपासून कोणताही हेतू नव्हता असे प्रथमदर्शनी पुराव्यातून सिद्ध होत आहे. तसेच आपण लग्नाला नकार दिल्यास महिला पोलिसांकडे तक्रार दाखल करेल त्यामुळे तक्रार टाळण्यासाठी त्याने समुपदेशकासमोर लग्नाची तयारी दर्शवली होती. आरोपीचा हेतू प्रामाणिक आणि खरा असता तर त्याने समुपदेशकांना पत्र लिहून लग्न करणार नसल्याचे कळवले नसते. त्यामुळे पत्रिका जुळत नसल्याने लग्नाचे वचन मोडले हा युक्तिवाद इथे ग्राह्य धरता येणार नाही, असे स्पषट करत न्यायालयाने सत्र न्यायालयाने दिलेले आदेश कायम ठेवत याचिकाकर्त्याला दिलासा देण्यास नकार दिला आणि याचिका फेटाळून लावली.