The fight will continue until Muslims get their constitutional rights; Elgar of the deprived Bahujan front

राज्य आणि केंद्र सरकारचे धोरण हे अल्पसंख्याक विरोधी असून मुस्लिमांच्या हक्क अधिकारांचे सातत्याने हनन होत आहे. जोवर मुस्लिमांना संवैधानिक हक्क अधिकार मिळत नाही तोवर वंचित बहुजन आघाडीचा सरकार विरोधी लढा सुरूच राहणार' असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी केले(The fight will continue until Muslims get their constitutional rights; Elgar of the deprived Bahujan front).

  मुंबई : राज्य आणि केंद्र सरकारचे धोरण हे अल्पसंख्याक विरोधी असून मुस्लिमांच्या हक्क अधिकारांचे सातत्याने हनन होत आहे. जोवर मुस्लिमांना संवैधानिक हक्क अधिकार मिळत नाही तोवर वंचित बहुजन आघाडीचा सरकार विरोधी लढा सुरूच राहणार’ असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी केले(The fight will continue until Muslims get their constitutional rights; Elgar of the deprived Bahujan front).

  पैगंबर मोहम्मद बिल आणि मुस्लिम आरक्षणासह मुस्लिम समाजाच्या संवैधानिक अधिकारांसाठी आणि राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विरोधी धोरणां विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. मुंबईत उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या नेतृत्वात आंदोलन झाले यावेळी त्या बोलत होत्या.

  शासनाची अल्पसंख्याक विरोधी मानसिकता

  मुस्लिम समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक मागासलेपणाबद्दल केंद्र व राज्य शासनाकडे विविध समित्यांचे आणि आयोगाचे अहवाल पडून आहेत. मात्र शासन मुस्लिम समाजाच्या विकासाबाबत कायमच उदासीन असल्याचे दिसून येते. न्यायालयाने मान्यता दिलेल्या ५% मुस्लिम शैक्षणिक आरक्षणाची शासन अंमलबजावणी करीत नाही यातच शासनाची अल्पसंख्याक विरोधी मानसिकता दिसून येते, असेही त्या म्हणाल्या.

  वंचित बहुजन आघाडी मुस्लिम प्रश्नांबाबत गंभीर

  तसेच धार्मिक भावना भडकावून समाजात तेढ निर्माण करण्याच्या विरोधात बंधुतेच्या मूल्यांचे हनन होवू नये म्हणून “पैंगंबर मोहम्मद बिल” गेल्या अधिवेशनात वंचित बहुजन आघाडी तर्फे मांडण्यात आले. मात्र शासनाने अजून या संबंधी काहीच कृती केली नाहीय. शासनाच्या याच वृत्तीच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ५ जुलै २०२१ रोजी विधान भवनावर मोर्चा काढुन उपरोक्त मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांपर्यंत पहोचवन्यात आले होते तसेच राज्यातील अनेक जिल्ह्यातून जनजागृती अभियान चालवण्यात आले तरी ही शासनातील तिन्ही पक्ष या मागणीकडे पुर्णत: दुर्लक्ष करत आहेत.

  परंतु वंचित बहुजन आघाडी मुस्लिम प्रश्नांबाबत गंभीर असुन सोमवार २२ नोव्हेंबर रोजी मुस्लिम समाजाच्या संवैधानिक अधिकारांसाठी राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणां विरोधात वंचित बहुज आघाडीच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. मुंबईत झालेल्या आंदोलनाला राज्य उपाध्यक्ष गोविंद दळवी, अबुल हसन, मोहम्मद पैगंबर बिल ड्राफ्ट कमिटी चे अब्दुल बारी, मुंबई समन्वय समिती सदस्य आणि मुंबईतील शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. या आंदोलनाला मुस्लिम लीग ने प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांची आंदोलनस्थळी प्रत्यक्ष भेट घेवून पत्र देवून पाठिंबा दिला आहे.