मुंबईत आली चौथी लस; केईएममध्ये ‘कोवोवॅक्स’ची ट्रायल

मुंबईत गेल्या वर्षी कोविशिल्ड, कोवॅक्सीन आणि यंदा फेब्रुवारीत स्पुटनिक लसीची चाचणी करण्यात आली. मुंबईत मोठ्या संख्येने कोवॅक्सीन आणि कोविशिल्डची लस दिली जात आहे. तर एक-दोन खासगी केंद्रांवर स्पुटनिकचीही लस दिली जात आहे. आता याच साखळीत अमेरिकेची नोवोवॅक्स आणि सीरम इन्िस्टट्युट ऑफ इंडियाद्वारे विकसित कोवोवॅक्सी या लसीची चाचणी देशभरात सुरू झाली आहे.

  मुंबई : मुंबईत सध्या कोविशिल्ड आणि कोवॅक्सीन या दोन लस देण्यात येत आहेत. तसेच मुंबईकरांना सुरक्षा देण्यासाठी आता चौथ्या कोरोना वॅक्सीनची चाचणी केईएम रुग्णालयात सुरू झाली आहे. केईएम रुग्णालयात ‘कोवोवॅक्स’ या लसीची चाचणी सुरू झाली आहे. ही चाचणी १८ वर्षांपुढील वयोगटातील लाकांवर केली जात आहे.

  मुंबईत गेल्या वर्षी कोविशिल्ड, कोवॅक्सीन आणि यंदा फेब्रुवारीत स्पुटनिक लसीची चाचणी करण्यात आली. मुंबईत मोठ्या संख्येने कोवॅक्सीन आणि कोविशिल्डची लस दिली जात आहे. तर एक-दोन खासगी केंद्रांवर स्पुटनिकचीही लस दिली जात आहे. आता याच साखळीत अमेरिकेची नोवोवॅक्स आणि सीरम इन्िस्टट्युट ऑफ इंडियाद्वारे विकसित कोवोवॅक्सी या लसीची चाचणी देशभरात सुरू झाली आहे.

  इंडियन कौन्सिंल आॅफ मेडिकल रिसर्चद्वारे (आयसीएमआर) देशभरात सुरू असलेल्या या चाचणीत केईएम रुग्णालयाची निवड झाली आहे. केईएम रुग्णालयाचे डीन डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले की, एथिक कमिटीने कोवोवॅक्सच्या चाचणीला परवानगी दिली आहे. ही चाचणी १८ वर्षांहून अधिक वय असणाऱ्यांवर केली जात आहे. परंतु, एथिक कमिटीने नियमांमुळे अधिक माहिती देण्यास नकार दिला.

  राज्यातील सात रुग्णालयांत चाचणी

  केईएम रुग्णालयाशिवाय राज्यात इतर सात रुग्णालयांत देखील चाचणी सुरू झाली आहे. पुण्यातील केईएम, सह्याद्री सुपर स्पेशालिटी रुग्णालय, नोबल रुग्णालय, डी. वाय पाटील, वर्धातील महात्मा गांधी इन्िस्टट्युट आॅफ मेडिकल सायन्स, दत्ता मेघे इन्सि्टट्युट ऑफ मेडिकल सायन्स आणि नागपूरमधील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात चाचणी सुरू झाली आहे.

  दुसरा डोस २२ दिवसांनंतर

  आयसीएमआरकडून मिळालेल्या माहितीनुसार, देशभरात १६०० जणांवर कोवोवॅक्सी चाचणी सुरू आहे. केईएम रुग्णालयात सुमारे ७० ते ८० जणांवर चाचणी सुरू आहे. १८ वर्षांवरील व्यक्तींना दोन डोस देण्यात येणार आहेत. या लसीचा दुसरा डोस २२ दिवसांनंतर देण्यात येणार आहे.

  ९० टक्के परिणामकारक

  परदेशात झालेल्या चाचणीत कोवोवॅक्स लस ९० टक्के परिणामकारक सिद्ध झाली आहे. तर लस घेतल्यानंतर ज्या व्यक्तींना माईल्ड किंवा मॉडरेट लक्षणे आढळली, त्यांची रिकव्हरीत चांगला परिणाम दिसून आला. देशभरात ही चाचणी वर्षभर चालणार आहे.