The government should help mango, cashew and fruit growers in Konkan who are in crisis due to Corona, nature storms and heavy rains; Demand of Pravin Darekar

कोकणातील आंबा व इतर फळ बागायतदारांकडे शासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. कोकणातला आंबा उत्पादक आज आझाद मैदानामध्ये आंदोलनासाठी बसला आहे. कोकणच्या या आंबा उत्पादकावर आधीच कोरोनाचे संकट आले. नंतर अतिवृष्टीने थैमान घातले. मग निसर्ग वादळ यामुळे तेथील शेतकरी आणि फळ बागायतदार अडचणीत आलेला आहे(The government should help mango, cashew and fruit growers in Konkan who are in crisis due to Corona, nature storms and heavy rains; Demand of Pravin Darekar).

  मुंबई : कोकणातील आंबा व इतर फळ बागायतदारांकडे शासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. कोकणातला आंबा उत्पादक आज आझाद मैदानामध्ये आंदोलनासाठी बसला आहे. कोकणच्या या आंबा उत्पादकावर आधीच कोरोनाचे संकट आले. नंतर अतिवृष्टीने थैमान घातले. मग निसर्ग वादळ यामुळे तेथील शेतकरी आणि फळ बागायतदार अडचणीत आलेला आहे(The government should help mango, cashew and fruit growers in Konkan who are in crisis due to Corona, nature storms and heavy rains; Demand of Pravin Darekar).

  आझाद मैदानावर आंदोलनास बसलेल्या बगायातदारांच्या मागण्या सरकारने समजून घ्याव्यात व त्यांना आर्थिक मदत घ्यावी अशी आग्रही मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज विधान परिषदेत केली. दरेकर यांनी विधान परिषदेत कोकणातील फळ बागायतदार, काजू, आंबा उत्पादक शेतकरी यांच्या प्रश्नाला नियम २८९ अन्वये वाचा फोडली. ते म्हणाले की, कोकणचा फळ बागायतदार आर्थिक अडचणीत आहे.

  कोकणचा फळ बागायतदार याचे कोरोना आणि नैसर्गिक आपत्तीमुळे उत्पादन कमी झाले. त्यामुळे त्याला विक्री करता आली नाही. पर्यायाने आंबा उत्पादकांना कर्जाची परतफेड करता आली नाही. त्यामुळे त्याच्या थकीत कर्जामुळे नवीन कर्जही त्याला मिळत नाही. त्यामुळे आंबा व फळ बागायतदारांना सरकारकडून मदत मिळावी.

  कोकणातल्या बागायतदारांचे आझाद मैदान येथे आंदोलन सुरू आहे, याकडेही दरेकर यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. ते म्हणाले की, बागायतदारांचे आंदोलन आझाद मैदान येथे सुरू आहे. सरकारने या विषयाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

  कोकणात नगदी शेतीचे प्रमाण कमी असल्यामुळे यापूर्वी झालेल्या तीनही कर्जमाफीचा लाभ कोकणातील शेतकऱ्यांना मिळालेला नाही.
  पश्चिम महाराष्ट्रात ऊस आणि साखर उद्योग आहे. विदर्भ-मराठवाड्यात कापूस आणि बियाणांना सरकारच्या माध्यमातुन मदत केली जाते. ग्रामीण अर्थव्यवस्था सांभाळली जाते. त्यामुळे कोकणातील आंबा, चिकू, नारळ बागायतदार यांनादेखील मदत करण्याची आवश्यकता आहे.

  कोकणातील बागायतदार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, कर्जमाफी द्या. कृषिदराने योग्य वीजबिल द्या. काजू बी, सुपारी या कोकणातील दोन मुख्य पिकांना हमीभाव द्या. आंब्यासाठी पणन विभागाने फळांच्या मार्केटिंगसाठी ठोस योजना बनवावी. आंबा केंद्रे उभारावीत, अपेडा, पणन, कोकणातील लीड बँका व राज्याच्या कृषी विभागाच्या माध्यमातून कोकणातील बागायतदार शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ द्यावे अशा मागण्या दरेकर यांनी केल्या.