मुंबईत कोरोनाची वाढती रुग्णसंख्या चिंता वाढवणार, रुग्ण दुपटीचा कालावधी निम्म्याने घसरला

मुंबईत आटोक्यात आलेली रुग्णसंख्या मागील काही दिवसांपासून वाढते आहे. दोनशेवर आलेली रोजच्या रुग्णांची संख्या पाचशेच्या घरात पोहचली आहे. रुग्ण दुपटीचा कालावधीही दिवसेंदिवस घसरत आहे. महिनाभरापूर्वी रुग्ण दुपटीचा कालावधी दोन हजारावर पोहचला होता.

    मुंबई – गेल्या काही दिवसांपासून रुग्णांची संख्या दुपटीने वाढली असून रुग्ण दुपटीचा कालावधीही निम्म्यावर घसरला आहे. महिनाभरापूर्वी दोन हजार दिवसांवर पोहचलेला रुग्ण दुपटीचा कालावधी १२०३ दिवसांपर्यंत खाली आला आहे. सक्रीय रुग्णांची संख्याही वाढते आहे. संभाव्य तिस-या लाटेच्या पार्श्वभूमीवर रुग्णांची वाढणारी आकडेवारी मुंबईकरांची चिंता वाढवणारी आहे.

    मुंबईत आटोक्यात आलेली रुग्णसंख्या मागील काही दिवसांपासून वाढते आहे. दोनशेवर आलेली रोजच्या रुग्णांची संख्या पाचशेच्या घरात पोहचली आहे. रुग्ण दुपटीचा कालावधीही दिवसेंदिवस घसरत आहे. महिनाभरापूर्वी रुग्ण दुपटीचा कालावधी दोन हजारावर पोहचला होता. मात्र आता १२०३ दिवसांपर्यंत घसरला आहे. त्यामुळे चिंता वाढते आहे. गणेशोत्सवात खरेदीसाठी वाढलेली गर्दी, गाठीभेटी, गावावरून तसेच परराज्यातून मुंबईत येणा-य़ांची गर्दी त्यामुळे रुग्णांची संख्या वाढण्याची भीती आहे.

    महिनाभरापूर्वी दोनशेपर्यंत रुग्णसंख्या घसरली होती. मात्र काही दिवसांपासून ही संख्या दुपटीने वाढली आहे. सक्रीय रुग्णांची संख्याही वाढते आहे. २० ऑगस्टला २८५३ सक्रीय रुग्ण होते. आता ही संख्या वाढून ४८०१ वर गेली आहे. तर २०५२ दिवसांवर असलेला रुग्ण दुपटीचा कालावधी गुरुवारपर्यंत १२०३ वर खाली आला आहे.

    तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. गुरुवारी दिवसभरात ४१०७३ चाचण्या करण्यात आल्या. मुंबईत सध्या एकही प्रतिबंधित क्षेत्र नाही. मात्र प्रतिबंधित इमारतींची संख्या हळूहळू वाढत असून सध्या ५१ इमारती प्रतिबंधित आहेत. कोरोनाचा नवीन प्रकार इतर शहरात वेगाने पसरत असल्याने पालिका सतर्क झाली आहे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नका, मास्कचा वापर करा, सोशल डिस्टनसिंग आदी कोविडचे नियमा पाळा असे आवाहन पालिकेने कले आहे.