कोरोना रुग्णांची वाढती संख्या धडकी भरवणारी! लॉकडाऊन बाबात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे अत्यंत महत्वाचे विधान

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सोबत आज राज्याच्या कोविड-१९ टास्क फोर्सची बैठक पार झाली. या बैठकीत कोरोना निर्बंधांसह, संभाव्य धोका आणि उपाययोजनांबाबत चर्चा झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यानी जनतेला गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे(The growing number of corona patients is shocking! Health Minister Rajesh Tope's very important statement regarding lockdown).

  मुंबई : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सोबत आज राज्याच्या कोविड-१९ टास्क फोर्सची बैठक पार झाली. या बैठकीत कोरोना निर्बंधांसह, संभाव्य धोका आणि उपाययोजनांबाबत चर्चा झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यानी जनतेला गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे(The growing number of corona patients is shocking! Health Minister Rajesh Tope’s very important statement regarding lockdown).

  निर्बंधांबाबत मुख्यमंत्री दोन दिवसांमध्येच निर्णय घेतील

  माध्यमांशी बोलताना टोपे म्हणाले की, कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा आज साडे पाच हजाराच्या घरात पोचली असून एकट्या मुंबईत साडे तीन हजारापेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर आज टास्क फोर्सची बैठक झाली. या बैठकीत कोरोना निर्बंधांसह, संभाव्य धोका आणि उपाययोजनांबाबत चर्चा झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे  यांनी दिली आहे. राज्यातील रुग्णवाढ पाहता कठोर निर्बंधांबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज उद्या दोन दिवसांमध्येच घेतील अशी माहिती टोपे यांनी दिली आहे.

  टेस्टिंग करीता एसजीटीएफ कीट

  ‘गर्दी टाळलीच पाहिजे. गर्दी नको कारण त्यामुळे संसर्ग झपाट्याने वाढेल. टेस्टिंग संदर्भात एसजीटीएफ हे कीट आहे. त्यातून ओमिक्रॉनचे डिटेक्शन होते. ते किट वापरले जावे, त्यामुळे डेल्टा व्हेरियंटचे रुग्ण किती आणि ओमिक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण किती हे समजेल. तर ट्रिटमेंटवर ‘मोनोपिरॅमिल’ हे केंद्र सरकार आणि महाराष्ट्रातील टास्क फोर्सने मान्य केलेले अॅन्टी व्हायरल ड्रग आहे. त्याची मागणी आणि पुरवठा याबाबत सविस्तर चर्चा झाली, अशी माहितीही टोपे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

  शाळेत लसीकरण न करता लसीकरण केंद्रावर

  केंद्र सरकारने १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या वयोगटाच्या शाळा सुरु ठेवल्या पाहिजेत. त्यांचे शाळेत लसीकरण न करता लसीकरण केंद्रावर घेऊन जाऊन, टप्प्याटप्प्याने करावं याबाबत चर्चा झाली. तर अद्याप लस न घेतलेल्याना लसीकरण तातडीने झाले पाहिजे, असा निर्णयही घेण्यात आला आहे. त्याबाबत प्रशासनाची दोन दिवसांत बैठक घेतली जाईल. जे जिल्हे लसीकरणात मागे आहेत त्यांना सूचना केल्या जाणार आहेत. ३१ डिसेंबरच्या आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळावी, संसर्ग होईल असे कुठलेही वर्तन करू नका. कोरोना नियमावलीचे पालन करा, असे आवाहनही टोपे यांनी यावेळी केले आहे.