MPSC आयोगाचा ऐतिहासिक निर्णय; खुल्या आणि ओबीसी गटातून परीक्षा देणाऱ्यांना जबरदस्त झटका

UPSC प्रमाणेच आता राज्य सेवा आयोगाची परिक्षा देण्यासाठी मर्यादा लागू करण्यात आली आहे. खुल्या गटातून ६ तर ओबीसी (OBC) गटातून फक्त ९ वेळाच या परीक्षा देता येणार. अनुसुचित जमाती आणि अनुसुचित जाती प्रवर्गातील उमेदवारांस कमाल संधीची मर्यादा लागू राहणार नाही.

मुंबई : MPSC आयोगाने एक मोठा निर्णय घेतला आहे. स्पर्धा परिक्षांमध्ये बसणाऱ्या उमेदवारांचे प्रयत्न अथवा संधीची संख्या आता मर्यादित करण्यात आली आहे. खुल्या आणि ओबीसी गटाला ही मर्यादा लागू करण्यात आली आहे.

यापुढे आता UPSC प्रमाणेच आता राज्य सेवा आयोगाची परिक्षा देण्यासाठी मर्यादा लागू करण्यात आली आहे. खुल्या गटातून ६ तर ओबीसी (OBC) गटातून फक्त ९ वेळाच या परीक्षा देता येणार आहेत. २०२१ पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे राज्य लोकसेवा आयोगाने अर्थान MPSC आयोगाने या निर्णयाची घोषणा केली.

खुल्या गटातून ६ तर ओबीसी (OBC) गटातून फक्त ९ वेळाच या परीक्षा देता येणार. अनुसुचित जमाती आणि अनुसुचित जाती प्रवर्गातील उमेदवारांस कमाल संधीची मर्यादा लागू राहणार नाही.

एखाद्या उमेदवाराने पूर्व परीक्षेत भाग घेतला असल्यास ही संबंधित स्पर्धा परीक्षेसाठी संधी समजली जाणार आहे. तसेच एखादा उमेदवार पूर्व परीक्षेच्या कोणत्याही एका पेपरसाठी उपस्थित राहिल्यास त्याची ती संधी समजली जाणार आहे.

उमेदवार कोणत्याही कारणास्तव परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरल्यास किंवा त्याची उमेदवारी रद्द झाल्यास तरीही परीक्षेस उपस्थिती संधी गणली जाणार आहे. २०२१ मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धांना या नियम लागू होणार आहे.