
मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र येथे असलेलं पावसाचे कमी दाबाचं क्षेत्र पुढे सरकले असून, ते आता गुजरातच्या दिशेनं पुढे सरकले आहे. येत्या २४ तासामध्ये हे कमी दाबाचे क्षेत्र अजून तीव्र होणार असून, त्याचे चक्रीवादळात रुपांतर होणार आहे. हे निर्माण होणारे चक्रीवादळ भारतीय किनारपट्टीपासून दूर जाण्याची शक्यता असून, ते पाकिस्तानच्या जवळ जाणार आहे. त्यामुळं या चक्रीवादळचा धोका भारतीय किनारपट्टीला बसणार नाही. असं हवामान विभागाने म्हटले आहे.
मुंबई : देशात पूर्व किनारपट्टीवर तयार झालेलं गुलाब चक्रीवादळमुळं मागील तीन चार दिवसात देशासह राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. गुलाब चक्रीवादळचा परिणाम महाराष्ट्राला सुदधा जाणवला, गुलाब चक्रीवादळामुळं सोमवारी आणि मंगळवारी राज्यात मुसळधार पाऊस पडेल असं हवामान विभागाने आधीच म्हटलं होतं. मंगळवारी मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. त्याप्रमाणे मंगळवारी मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस पडला.
आता मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र येथे असलेलं पावसाचे कमी दाबाचं क्षेत्र पुढे सरकले असून, ते आता गुजरातच्या दिशेनं पुढे सरकले आहे. येत्या २४ तासामध्ये हे कमी दाबाचे क्षेत्र अजून तीव्र होणार असून, त्याचे चक्रीवादळात रुपांतर होणार आहे. हे निर्माण होणारे चक्रीवादळ भारतीय किनारपट्टीपासून दूर जाण्याची शक्यता असून, ते पाकिस्तानच्या मकरान किनारपट्टीकडे जाणार आहे. त्यामुळं या चक्रीवादळचा धोका भारतीय किनारपट्टीला बसणार नाही. असं हवामान विभागाने म्हटले आहे.
सध्या गुलाब चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली असून, बुधवारपासून पाऊस सुद्धा कमी पडणार आहे, म्हणजे मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस पडणार असल्याचं प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई येथील शुभांगी भुते यांनी म्हटले आहे.