
लोकप्रतिनिधी या नात्याने जनतेच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचविणे, हे माझे कर्तव्य आहे. घाटकोपर- मानखुर्द लिंक रोडवरील उड्डाणपुलाच्या नामकरणाबाबतही स्थानिकांची मागणी केवळ सरकारपर्यंत पोहोचविण्याचे काम मी केले आहे, असा खुलासा खासदार राहुल शेवाळे यांनी केला आहे. घाटकोपर- मानखुर्द लिंक उड्डाणपुलाला गरीब नवाज ख्वाजा याचे नाव देण्याची मागणी शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी केली होती. त्यावरून भाजप कडून प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आल्यानंतर या खासदार शेवाळे यांनी खुलासा केला आहे. या प्रकरणाला धार्मिक रंग देऊन समाजात असंतोषाचे वातावरण तयार करणाऱ्यांना त्यांनी दिला आहे की इशारा आहे की जनता या स्वार्थी राजकारणाला बळी पडणार नाही, असे ते म्हणाले.
मुंबई : लोकप्रतिनिधी या नात्याने जनतेच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचविणे, हे माझे कर्तव्य आहे. घाटकोपर- मानखुर्द लिंक रोडवरील उड्डाणपुलाच्या नामकरणाबाबतही स्थानिकांची मागणी केवळ सरकारपर्यंत पोहोचविण्याचे काम मी केले आहे, असा खुलासा खासदार राहुल शेवाळे यांनी केला आहे. घाटकोपर- मानखुर्द लिंक उड्डाणपुलाला गरीब नवाज ख्वाजा याचे नाव देण्याची मागणी शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी केली होती. त्यावरून भाजप कडून प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आल्यानंतर या खासदार शेवाळे यांनी खुलासा केला आहे. या प्रकरणाला धार्मिक रंग देऊन समाजात असंतोषाचे वातावरण तयार करणाऱ्यांना त्यांनी दिला आहे की इशारा आहे की जनता या स्वार्थी राजकारणाला बळी पडणार नाही, असे ते म्हणाले.
शेवाळे म्हणाले की, घाटकोपर- मानखुर्द लिंक उड्डाणपुलाला नेमके काय नाव द्यायचे, याचा अंतिम निर्णय मुंबई महानगरपालिकेकडून घेतला जाईल. सदर उड्डाणपुलाचे, ‘छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुल’ असे नामकरण करण्याची मागणी गेल्या वर्षीच केली होती, असा दावा खासदार मनोज कोटक यांनी केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्यदैवत असून त्यांच्या नावाला कोणताही विरोध करण्याचा प्रश्नच नाही. खासदार कोटक यांच्या मागणीबाबत याआधीच मला माहिती असती, तर नव्या नावाचा प्रस्ताव पुढे आलाच नसता. तसेच स्थानिक नगरसेवक विठ्ठलजी लोकरे यांनी सदर उड्डाणपुलाचे नाव ‘वीर क्रांतिकारक वस्ताद लहुजी साळवे’ यांचे नाव द्यावे, अशी मागणी यापूर्वीच केलेली आहे. याशिवाय काही लोकप्रतिनिधींनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव सदर उड्डाणपुलासाठी सुचवले आहे, असे शेवाळे म्हणाले.
शेवाळे म्हणाले की, यापैकी कोणाचाही प्रस्ताव माझ्याकडे न आल्याने मला याबाबत माहिती नव्हती. या सर्व महापुरुषांविषयी मला नितांत आदर आहे. मात्र, केवळ स्वार्थासाठी या साऱ्या प्रकरणाबाबत गैरसमज निर्माण करून, याला धार्मिक रंग देऊन अतिशय हीन राजकारण करण्याचा प्रयत्न काही राजकारणी आणि त्यांचे कार्यकर्ते करत आहेत, ही खेदाची बाब आहे. या प्रकरणाला धार्मिक रंग देऊन समाजात असंतोषाचे वातावरण तयार करणाऱ्यांना माझा इशारा आहे की जनता तुमच्या या स्वार्थी राजकारणाला बळी पडणार नाही, असे ते म्हणाले.