The massive sale of condoms in the lockdown; More shopping during the day than at night

रात्रीच्या तुलनेत दिवसा कंडोम खरेदी करणाऱ्या देशातील शहरामध्ये हैदराबाद अव्वलस्थानी आहे. हैद्राबादमध्ये तर दिवसा तब्बल सहा पट कंडोम विक्री झाली आहे. चेन्नईमध्ये ५ पट, जयपुरमध्ये ४ पट तर दिल्ली आणि मुंबईमध्ये रात्रीच्या तुलनेत दिवसा ३ पटीने कंडोम खरेदी करण्यात आले.

मुंबई : लॉकडाउनमध्ये कंडोमची अफाट विक्री झाल्याची माहिती एका सर्वेक्षमातून समोर आली आहे. त्यातही रात्रीपेक्षा दिवसाच कंडोमची जास्त खरेदी झाली आहे. Dunzo App या कंपनीने या बाबातचे सर्वेक्षण केले होते.

कोरोनाच्या संकटामुळे सगळे व्यवहार ठप्प झाले. संपूर्ण जग लॉकडाउन झाले. या निमित्ताने जोडप्यांना जास्तीत जास्त वेळ एकत्रीत घालवता आला. याचा परिणाम कंडोम विक्रीवरही पहायला मिळाला.

लॉकडाउन काळात कंडोमची मागणी वाढल्याचे Dunzo App या कंपनीच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. रात्रीच्या तुलनेत दिवसाच्या वेळेत तिप्पट कंडोम विक्री झाल्याचेही या सर्वेक्षणात म्हंटले आहे.