एमपीएससीची 2 जानेवारीला होणारी परीक्षा पुढे ढकलली

येत्या दोन जानेवारीला होणारी राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे (The MPSC exam scheduled for January 2 has been postponed). परीक्षा पुढे ढकलल्याने नवे वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे.

    मुंबई : येत्या दोन जानेवारीला होणारी राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे (The MPSC exam scheduled for January 2 has been postponed). परीक्षा पुढे ढकलल्याने नवे वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे.

    कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्तीसंदर्भात जाहिराती प्रसिद्ध झाल्या नसल्यामुळे काही उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ओलांडली गेली आहे. त्यामुळे काहींची परीक्षेस बसण्याची संधी हुकली आहे.

    अशा उमेदवारांना परीक्षेस बसण्याची संधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात शासनाकडून घेण्यात आलेल्या निर्णयाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने आयोगामार्फत रविवार दिनांक 02 जानेवारी, 2022 रोजी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा- 2021 पुढे ढकलण्यात येत आहे, असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एका पत्राद्वारे स्पष्ट केले आहे. परीक्षेचा सुधारित दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे. परीक्षा पुढे ढकलल्याने नवे वेळापत्रक जाहीर होणार असून रविवारी दोन जानेवारीला होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.