एनआयएने पथक वाझेंना घेऊन ठाण्यात गेले; केला सीन रिक्रिएट

    मुंबई :  मुकेश अंबानींच्या बंगल्यासमोर स्फोटक सापडल्या प्रकरणी एनआयए या प्रकरणाची सर्वंकष चौकशी करीत असून बुधवारी सचिन वाझे यांना घेऊन एनआयएचे एक पथक ठाणे येथे गेले व तेथे त्यांनी सीन रिक्रिएशन केले.

    ठाण्यातच स्कॉर्पियोमध्ये स्फोटके भरली व ती कार अंबानींच्या घरासमोर पार्क करण्याचे षडयंत्र रचण्यात आले होते. यासोबतच एनआयए आता संयुक्त पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे आणि पोलिस उपायुक्त (गुन्हे) प्रकाश जाधव यांचीही चौकशी करण्याची शक्यता आहे.

    कोणाच्या सांगण्यावरून वाझेंनी चौकशीची सूत्रे सोपविण्यात आली होती याची विचारणा केली जाणार आहे. हटविण्यात आलेले पोलिस आयुक्त परमबीरसिंह यांनी या प्रकरणाचा तपास वझेंकडेच का सोपविला याचाही शोध एनआयए घेत आहे.

    उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीत स्फोटके सापडली. यानंतर या गाडीचे कथित मालक मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक झाली आहे.