प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

तिसऱ्या लाटेचा धोका असताना कोरोनाच्या रुग्णसंख्येबाबत मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यासह मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. राज्यात ९,७७१ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.

    मुंबई : बुधवारी राज्यात ९,७७१ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६०,६१,६०४ झाली आहे. बुधवारी १०,३५३ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ५८,१९,९०१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.०२ % एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण १,१६,३६४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

    दरम्यान, राज्यात बुधवारी १४१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. नोंद झालेल्या एकूण १४१ मृत्यूंपैकी १०३ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ३८ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०१ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,१६,३७,९५० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६०,६१,४०४ (१४.५६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,१७,९२६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,१७३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

    मुंबईत दिवसभरात ७०६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आता पर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७२२२२२ एवढी झाली आहे. तर २५ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आता पर्यंत १५४५१ मृत्यूची नोंद करण्यात आली.