राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली; नऊ हजार पेक्षा पण कमी रुग्णांची नोंद

मंगळवारी राज्यात ८,४७० नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५९,८७,५२१ झाली आहे. आज ९,०४३ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ५७,४२,२५८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.९% एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण १,२३,३४० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

  मुंबई : मंगळवारी राज्यात ८,४७० नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५९,८७,५२१ झाली आहे. आज ९,०४३ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ५७,४२,२५८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.९% एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण १,२३,३४० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

  दरम्यान, मंगळवारी राज्यात १८८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. नोंद झालेल्या एकूण १८८ मृत्यूंपैकी १४३ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ४५ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने राज्यातील एकूण मृत्यूची संख्या २९४ ने वाढली आहे.

  हे २९४ मृत्यू, नाशिक-७०, ठाणे-५५, अहमदनगर-३३, पुणे-२४, नागपूर-२२, सांगली-१५, सातारा-१४, औरंगाबाद-९, रत्नागिरी-९, अकोला-८, भंडारा-५, पालघर-५, यवतमाळ-५, रायगड-४, उस्मानाबाद-३, जळगाव-२, लातूर-२, सोलापूर-२, बीड-१, चंद्रपूर-१, धुळे-१, जालना-१, कोल्हापूर-१, परभणी-१ आणि सिंधुदुर्ग-१असे आहेत.

  सध्या राज्यातील मृत्यूदर १.९८% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,९८,८६,५५४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५९,८७,५२१ (१५.०१टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,५८,८६३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,१९६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

  मुंबईत दिवसभरात ५६८

  मुंबईत दिवसभरात ५६८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आता पर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७२१०९९ एवढी झाली आहे. तर १० कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आता पर्यंत १५३१५ मृत्यूची नोंद करण्यात आली.