Central Railway's tremendous idea; Oxygen Parlor at Mumbai Railway Stations

पीडित महिला कल्याण येथे राहणारी आहे. ती मुंबईत नोकरीला आहे. पीडित तरुणी घरी जाण्यासाठी दादर रेल्वे स्थानकात लोकलची वाट पाहत थांबली होती. यावेळी 28 वर्षीय आरोपी युवक संजय यादव पीडितेच्या दिशेनं आला. पीडितेला काही कळायच्या आतच आरोपीनं अचानक तिला घट्ट मिठी मारली. या घडलेल्या प्रकारामुळे पीडित महिला गोंधळून गेली आणि घाबरली.

    मुंबई : दादर हे मुंबईतील सर्वात गजबलेलं रेल्वे स्थानक. मात्र, सध्या कोरोना नियमावलीमुळे मुंबईतील सर्वच रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी कमी आहे. याचाच फायदा घेत एका विकृत तरुणाने एका अनोखळी महिलेला घट्ट मिठी मारली. यामुळे महिला दचकली. मात्र, सहप्रवाशांच्या सतर्कतेमुळे हा विकृत तरुण पोलिसांच्या हाती लागला.

    पीडित महिला कल्याण येथे राहणारी आहे. ती मुंबईत नोकरीला आहे. पीडित तरुणी घरी जाण्यासाठी दादर रेल्वे स्थानकात लोकलची वाट पाहत थांबली होती. यावेळी 28 वर्षीय आरोपी युवक संजय यादव पीडितेच्या दिशेनं आला. पीडितेला काही कळायच्या आतच आरोपीनं अचानक तिला घट्ट मिठी मारली. या घडलेल्या प्रकारामुळे पीडित महिला गोंधळून गेली आणि घाबरली.

    यानंतर महिलेने या तरुणाला पकडण्याचा प्रयत्न करत गोंधळ घातला. यावेळी सहप्रवाशी आणि दादर रेल्वे स्थानकावर उपस्थित असणाऱ्या रेल्वे पोलिसांनी आरोपी संजय यादवला लगेच पकडलं. याप्रकरणी पीडित महिलेनं दादर पोलीस ठाण्यात विनयभंगाची फिर्याद दाखल केली आहे. दादर पोलिसांनी आरोपी संजय यादवला अटक केली आहे. या घटनेमुळे महिलांमध्ये दहशत पसरली आहे.