विमानाने महामार्गावरील कारला दिली जोरदार धडक, पहा हा थरारक VIDEO

वैमानिकाने आपात्कालीन स्थिती लक्षात घेऊन विमान धावपट्टीवर सुखरूप उतरविल्याचे आपण नेहमीच वाचतो. आपण अशा थरारक घटनेचे व्हिडिओसुद्धा सोशल मीडियावर पाहतो; पण एखाद्या वैमानिकाने आपले कौशल्य पणाला लावत विमान महामार्गावर उतरविल्याचा व्हिडिओ तुम्ही क्वचितच पाहिला असेल. अमेरिकेतील मिनेसोटा येथे अलीकडेच अशीच एक घटना घडली आहे. ज्यामध्ये महामार्गावर कार धावत असताना त्याने विमान उतरविले ज्यामध्ये विमानाने कारला जोरदार धडक दिली; पण मोठा अपघात होण्यापासून टळला. 

मुंबई (Mumbai).  वैमानिकाने आपात्कालीन स्थिती लक्षात घेऊन विमान धावपट्टीवर सुखरूप उतरविल्याचे आपण नेहमीच वाचतो. आपण अशा थरारक घटनेचे व्हिडिओसुद्धा सोशल मीडियावर पाहतो; पण एखाद्या वैमानिकाने आपले कौशल्य पणाला लावत विमान महामार्गावर उतरविल्याचा व्हिडिओ तुम्ही क्वचितच पाहिला असेल. अमेरिकेतील मिनेसोटा येथे अलीकडेच अशीच एक घटना घडली आहे. ज्यामध्ये महामार्गावर कार धावत असताना त्याने विमान उतरविले ज्यामध्ये विमानाने कारला जोरदार धडक दिली; पण मोठा अपघात होण्यापासून टळला.


अमेरिकेतील मिनेसोटा (minnesota) भागात सिंगल इंजिन असलेल्या एका विमानानं महामार्गावर विमान उतरवलं आहे. हे विमान लँड करत असताना तो SUV कारवर जाऊन धडकला आणि मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे.

कारवर हे विमान आदळल्याने कारचं नुकसान झालं आहे. सुदैवानं या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिनेसोटा डिपार्टमेंट ऑफ ट्रान्सपोर्टने या घटनेचा व्हिडीओ ट्वीटरवर शेअर केला आहे. विमान 35W महामार्गावर लॅण्ड झाल्याची माहिती या व्हिडीओमध्ये देण्यात आली आहे. सुदैवानं यावेळी कोणताही मोठा अपघात घडला नाही किंवा कोणतीही मोठी जीवितहानी झाली नाही.

या व्हिडीओला आतापर्यंत 87 हजारहून अधिक लोकांनी पाहिले आहे. काही लोकांनी मजेशीर कमेंट्स केल्या तर काहींनी अशापद्धतीनं विमान उतरवणं चुकीचं असून कोणताही मोठा अपघात घडू शकला असता असंही म्हटलं आहे. माझा विश्वास बसत नाही की विमानानं एवढी जोरात धडक दिल्यानंतरही कार चालकाला गंभीर दुखापत झाली नाही. तो सुरक्षित आहे हा एक चमत्कार म्हणायला हवा अशी प्रतिक्रिया वैमानिकानं स्थानिक मीडियाला दिली आहे.