Sharad Pawar Vs Devendra Fadnavis

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना सप्टेंबर २०१९ मध्ये ईडीची नोटीस बजावल्याची बातमी सा-या राज्यात आणि देशात गाजली होती. त्यावेळी शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत ईडीच्या नोटीशीची वाट न पहाता आपण स्वत: ईडी कार्यालयात जाणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर मात्र ईडीनेच त्यांना चौकशीला येण्याची सध्या गरज नसल्याचे कळविले होते. अगदी त्याच पध्दतीने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात बदल्याच्या घोटाळ्यासंदर्भात आरोप करत थेट केंद्रीय तपास यंत्रणाना पुरावे सादर केले(The political maneuver that Sharad Pawar made a few years ago is now being discussed by Sem and Devendra Fadnavis ).

    मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना सप्टेंबर २०१९ मध्ये ईडीची नोटीस बजावल्याची बातमी सा-या राज्यात आणि देशात गाजली होती. त्यावेळी शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत ईडीच्या नोटीशीची वाट न पहाता आपण स्वत: ईडी कार्यालयात जाणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर मात्र ईडीनेच त्यांना चौकशीला येण्याची सध्या गरज नसल्याचे कळविले होते. अगदी त्याच पध्दतीने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात बदल्याच्या घोटाळ्यासंदर्भात आरोप करत थेट केंद्रीय तपास यंत्रणाना पुरावे सादर केले(The political maneuver that Sharad Pawar made a few years ago is now being discussed by Sem and Devendra Fadnavis ).

    मात्र राज्याचे विरोधीपक्षनेते म्हणून त्यांना राज्य सरकारला विश्वासात घेवून चौकशीसाठी त्यांच्याकडे तक्रार कराविशी वाटली नाही. मात्र त्याना पाच वेळा पोलिसांनी पत्र पाठवून आपल्या आरोपांतील माहिती द्या असे सांगूनही ते गेले नाहीत. त्यानंतर सहाव्यांदा पोलिसांची नोटीस आल्यावर फडणवीसांनी शरद पवारांच्या प्रमाणेच पत्रकार परिषद घेत आपण जबाब देण्यासाठी पोलिस स्टेशनला जाणार असल्याची घोषणा करत भाजपाने राज्यभरातील कार्यकर्त्यांनाही  तेथे येण्याचे आवाहन केले. त्यामुळे फडणवीसांनी शरद पवारांच्या ‘त्या’ राजकिय डावपेचाची पुन:रावृत्ती केल्याची राजकिय चर्चा सुरु झाली आहे.

    पवारांप्रमाणेच चौकशीसाठी स्वत: जाण्याची घोषणा

    शरद पवारांनी चौकशीसाठी ईडी कार्यालयात स्वत: जाण्याची घोषणा केल्यानंतर राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मुंबईत जमा होवू लागले. विशेष म्हणजे बॅलार्ड पिअर्स येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालया शेजारीच ईडीचे कार्यालय असून या कार्यालया जवळही कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. शरद पवार हे जर ईडी कार्यालयात गेले तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो असा अंदाज आल्याने त्यावेळी सत्तेवर असलेल्या भाजप सरकारने शरद पवारांनी जाहीर केलेल्या तारखेच्या दिवशीच सकाळीच त्यावेळचे पोलिस सह आयुक्त सदानंद दाते यांनी पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी जात शरद पवारांशी चर्चा केली. त्याचबरोबर ईडीच्या अधिकाऱ्यांशीही चर्चा केली. त्यावेळी ईडीने पवारांना सध्या येण्याची गरज नाही. ज्यावेळी गरज वाटेल त्यावेळी आम्ही बोलावू असे पोलिसांना सांगितले. त्यानंतर ईडीकडून शरद पवारांना नोटीस आल्याचे ऐकिवात नाही नंतर एका प्रकरणात त्यांचा जबाब मागवून घेण्यात आला.

    फडणवीसांचा जबाब माजी गृहमंत्री म्हणून घेणे आवश्यक

    राज्यात आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी अवैधरित्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे आणि मंत्र्यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी राज्य सरकारकडून शुक्ला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात शुक्ला यानी सरकारची माफी देखील मागितली होती, मात्र त्यांच्याकडील माहिती पत्रकार परिषदेत सादर करत स्टिंग करून बदल्यांचा घोटाळा झाल्याचे आरोप विरोधीपक्षनेते फडणवीस यांनी केले. विशेष म्हणजे हे स्टिंग झाले त्याकाळात गृहमंत्री स्वत: फडणवीस हेच होते. त्यामुळे या टॅपिंग प्रकरणातील अहवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माध्यमांसमोर न सांगता त्यांनी थेट केंद्रीय गृहसचिवांना तो सादर केला.

    मात्र, आता हा तपास मुंबई पोलिसांकडून करण्यात येत आहे. याच आधारे फडणवीसांचा जबाब माजी गृहमंत्री म्हणून घेणे आवश्यक आहे. मुंबई पोलिसांनी फडणवीस यांना प्रश्नावली पाठवून देत त्यांचे म्हणणे सादर करण्याची विनंती केली होती. परंतु पाचही वेळेस देवेंद्र फडणवीसांनी कोणतेही प्रत्युत्तर मुंबई पोलिसांना दिले नाही. मात्र सहाव्यांदा पोलिसांनी फडणवीसांना पाठविल्या पत्रात जबाब देण्यासाठी बीकेसीतील सायबर पोलिस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले. त्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी राजकिय डावपेचाचा भाग म्हणून त्यांनी जाहिर पत्रकार परिषद घेत पवारांच्या डावपेचाची पुन:रावृत्ती करण्याचा प्रयत्न केला आहे.

    फडणवीसांसमोर महाविकास आघाडी मागे सरकल्याचा संदेश

    राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरु असताना हे नाट्य घडत असल्याने राज्यात नव्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी महाविकास आघाडीकडून काळजी घेण्यात येत आहे. फडणवीसांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर लगोलग सुत्रे हालली आणि पोलिसांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन करत तुम्ही येवू नका आम्हीच जबाब नोंदविण्यासाठी येतो असा निरोप दिला. यामुळे काही काळ फडणवीसांसमोर महाविकास आघाडी मागे सरकल्याचा संदेश जनतेत जाणार असला तरी फडणवीसांच्या जबाबातून त्या स्टिंग मधील बदली घोटाळा प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी फडणवीस करत आहेत. शरद पवार यांच्या डावपेचाची पुन:रावृत्ती करण्याचा प्रयत्न  भाजप आणि फडणवीस यांनी केल्याने त्याची मात्र चर्चा राजकिय वर्तुळात होत आहे.