राज्यातील ‘या’ भागात पुढील तीन-चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाने वर्तविला अंदाज

राज्यात पुढील 3 ते 4 दिवस मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. आज काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. सोमवारी 27 सप्टेंबरपासून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्यानं पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

    मुंबई : अनेक दिवसांपासून राज्यात मुसळधार पावसानं थैमान घातलं आहे. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे. याची तीव्रता वाढून आता याचं रुपांतर गुलाब चक्रीवादळामध्ये झालं आहे.

    दरम्यान या चक्रीवादळामुळे राज्यात पुढील 3 ते 4 दिवस मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. आज काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. सोमवारी 27 सप्टेंबरपासून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

    अशातच सोलापूर, हिंगोली आणि अकोल्यातही पावसाची जोरदार फटकेबाजी पाहायला मिळाली. हवामान खात्यानं पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांनाही सतर्क राहण्यास सांगितलं आहे.

    मागच्या दोन दिवसांमध्ये 35 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून सध्या पावसानं विश्रांती घेतली आहे. मात्र, या पावसानं ऐन काढणीला हजेरी लावल्यानं सोयाबीन पीक पाण्याखाली गेले आहे. यामुळे बळीराजाच्या अडचणीमध्ये भर पडली आहे.

    दरम्यान, पावसानं यंदा राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या श्रेणीमध्ये अधिक पाऊसाची नोंद झाली आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वाऱ्यांचा वेग देखील अधिक राहण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.