राष्ट्रीय स्तरावर एका मजबूत विरोधी आघाडीची स्थापना होणे गरजेचे, संजय राऊतांनी दिली अशी प्रतिक्रिया…

हे ज्या राज्यस्तरीय नेत्यांना कळत नाही त्य़ांनी कृपा करून बोलू नये. या विषयावर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी बोलले तर ठीक, ते देखील यावर चिंतन करत आहेत, असे प्रत्यूत्तर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काँग्रेसच्या नेत्यांना दिले आहे.

    राष्ट्रीय स्तरावर एका मजबूत विरोधी आघाडीची स्थापना होणे गरजेचे आहे. हे ज्या राज्यस्तरीय नेत्यांना कळत नाही त्य़ांनी कृपा करून बोलू नये. या विषयावर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी बोलले तर ठीक, ते देखील यावर चिंतन करत आहेत, असे प्रत्यूत्तर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काँग्रेसच्या नेत्यांना दिले आहे.

    ठाकरे सरकार महाराष्ट्रात येत आहे, त्यांच्या सोबत जाऊ नये. तुमच्या फाईल तयार आहेत. यड्रावकरांपासून अनेक आमदारांना रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) धमक्या देत होत्या. हे सर्वांना माहिती होते. भाजपा सरकारसोबत जा, असे इशारे पोलीस खात्याकडून दिले जात होते. शुक्लांना महाविकास आघाडीच्या सरकारने तरीही ६महिने पदावर ठेवले होते याचे मला आश्चर्य वाटते, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितले.