coronavirus vaccine severe allergic reaction in us health worker minutes after pfizer shot

वैक्सीनबाबत साेशल मीडियावर दिशाभूल करणारे व्हिडीओ व्हायरल झाले हाेते. ज्यामुळे, मुस्लिम समाजामध्ये अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. परिणामी, मुस्लिम समाजाने या वैक्सीनबाबत आवाज उठविला असून आठ दिवसांपूर्वी मुुंबईतील नऊ मुस्लिम संघटनांनी मुंबई स्थित बिलाल मस्जिदमध्ये काेराेना वैक्सीनबाबत एक बैठक घेतली हाेती.

नीता परब

मुंबई: काेराेना वैक्सीनबाबत (covid  vaccine) मुस्लिम समाजात ( Mumbai Muslims )मागील काही दिवसांपासून उलटसुलट चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईत सुन्नी धर्मगुरुंनी याबाबत एक विशेष बैठकही घेण्यात आली हाेती. त्यानंतर आता मुंबईतील धर्मगुरुंनी जागतिक आराेग्य संघटनेकडे (WHO) धाव घेतली आहे. वैक्सीन तयार करण्याकरीता काय-काय घटक समाविष्ट केले अाहेत? याबाबत माहिती द्यावी, असे पत्र रजा अकादमी संघटनेने जागतिक अाराेग्य संघटनेला पाठविले आहे.

मागील नऊ महिन्यांपासून काेराेना वायरसने जगभरात थैमान घातले आहे. भारतात या वायरसमुळे आतापर्यंत एक कोटींपेक्षाही अधिक नागरिक संक्रमित झाले आहेत. यािशवाय लाखाे लाेकांचा मृत्यू झाला आहे. आता संपूर्ण जग काेराेना लसीची आतुरतेने वाट पाहत आहे. याच पार्श्वभूमीवर, मुंबईत देखील सध्या नायर, केईएम, सायन, जेजे या रुग्णालयात काेराेना वैक्सीनची ट्रायल सुरु आहे. ज्यामुळे येत्या काही महिन्यात प्रत्यक्षात लसीकरणाला सुरुवात हाेईल.


दुसरीकडे, मात्र मुस्लिम समाजाकडून या वैक्सीनबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यानच्या, काळात वैक्सीनबाबत साेशल मीडियावर दिशाभूल करणारे व्हिडीओ व्हायरल झाले हाेते. ज्यामुळे, मुस्लिम समाजामध्ये अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. परिणामी, मुस्लिम समाजाने या वैक्सीनबाबत आवाज उठविला असून आठ दिवसांपूर्वी मुुंबईतील नऊ मुस्लिम संघटनांनी मुंबई स्थित बिलाल मस्जिदमध्ये काेराेना वैक्सीनबाबत एक बैठक घेतली हाेती.

या बैठकीत वैक्सीनबाबत चर्चा करण्यात आली व या वैक्सीनमध्ये काय-काय घटक समािवष्ट केले आहेत, याची संपूर्ण माहिती राज्य सरकारनेे मुस्लीम धर्मगुरुंना द्यावी, त्यानंतरच लसीकरणाकरीता मुस्लीम समाजाकडून सहभाग नाेंदिवण्यात येईल, असे बैठकीत स्पष्ट करण्यात आले हाेते.

दरम्यान, आता या मुद्द्याला धरत माैलाना माेइनुद्दीन अशरफी यांच्या निर्देशानुसार, रजा अकादमी संघटनेने बुधवारी जागतिक आराेग्य संघटनेला पत्र लिहिले आहे. याबाबत रजा अकादमीचे संस्थापक महासचिव सईद नूरी यांनी सांगितले की, या पत्राच्या माध्यमातून वेगवेगळ्या देश-विदेशात तयार करण्यात येत असलेली काेराेना वैक्सीनमध्ये काय-काय घटकांचा समाविष्ट करण्यात आला आहे, याची थाेडक्यात माहिती मिळू शकेल. या घटकांमध्ये आक्षेपार्ह घटक आढळल्यास मुस्लिम समाजाकडून लस घेतली जाणार नसल्याचे नूरी म्हणाले.