धोका वाढला; कोरोनासोबत होणार साथीच्या रोगांमुळे BMC घेतला मोठा निर्णय

कोरोनाची दुसरी लाट कमी झाली असली तरी पावसामुळे उद्भवणारे साथीचे आजार फैलावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यू, एच1एन1 सारखे आजार डोके वर काढू लागले आहेत. कोविडच्या रुग्णासोबत पावसाळी आजाराचे रुग्ण वाढत असल्याने खबरदारी म्हणून कोरोनासोबत मलेरिया, डेंग्यू, एच1एन1 चाचणी सक्तीची करण्यात आली आहे.

    मुंबई : कोरोनाची दुसरी लाट कमी झाली असली तरी पावसामुळे उद्भवणारे साथीचे आजार फैलावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यू, एच1एन1 सारखे आजार डोके वर काढू लागले आहेत. कोविडच्या रुग्णासोबत पावसाळी आजाराचे रुग्ण वाढत असल्याने खबरदारी म्हणून कोरोनासोबत मलेरिया, डेंग्यू, एच1एन1 चाचणी सक्तीची करण्यात आली आहे.

    कोविडसोबत सध्या पावसाळी आजार डोके वर काढू लागले आहेत. त्यामुळे खबरदारी घेण्यास पालिकेने कंबर कसली आहे. शहरात कोरोना बाधित रुग्ण सापडत असतानाच पावसाळ्यातील साथीच्या आजाराची शक्यता लक्षात घेत पालिकेने कंबर कसली आहे. कोरोना संसर्गाची लक्षण आणि मलेरिया, डेंग्यू,एच1एन1 या आजाराची लक्षणे सारखी असतात, त्यामुळे पावसाळी आजार झालेल्या व्यक्तीला कोरोनाची बाधा झाल्याची भीती नागरिकांमध्ये पसरू शकते. त्यामुळे रुग्णांमधील भीती कमी व्हावी आणि ते मानसिक तणावाखाली येऊ नयेत यासाठी कोरोनासह अन्य चाचण्या करण्याचा निर्णय पालिकेकडून घेण्यात आले आहे.

    कोरोना आणि साथीच्या आजारांची लक्षणे लक्षात घेता कोरोना रुग्णांबरोबरच नॉन कोविड रुग्णांची गैरसोय होणार नाही. याकडे पालिकेने लक्ष देताना सायन, नायर, केईएम रुग्णालयामध्ये काही बेड आरक्षित ठेवण्यात आले असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

    साथीच्या आजारांसाठी पालिका सज्ज असून नागरिकांनीही साथीच्या आजारांकडे दुर्लक्ष करू नये. घरगुती औषधोपचार टाळावेत आणि तपासणीसाठी रुग्णालयात जावे. पालिका गरजेनुसार बेडची व्यवस्था वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहे. अशी माहिती पालिकेच्या मुख्य रुग्णालयाचे संचालक डॉ. रमेश भारमल यांनी दिली.