मुंबई फोर्ट परिसरातील इमारतीचा स्लॅब कोसळला, ४० जणांना सुखरुप वाचवण्यात यश

मुंबईत जुन्या जर्जर झालेल्या इमारतीचे भाग कोसळण्याच्या घटना सुरुच आहेत. आज सकळी ७.३० च्या सुमारास दक्षिण मुंबईतील फोर्ट परिसरातील आशापुरा इमारतीचा स्लॅब कोसळला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. या इमारतीतून ४० जणांची सुटका करण्यात आली आहे.

    मुंबई : मुंबईत जुन्या जर्जर झालेल्या इमारतीचे भाग कोसळण्याच्या घटना सुरुच आहेत. आज सकळी ७.३० च्या सुमारास दक्षिण मुंबईतील फोर्ट परिसरातील आशापुरा इमारतीचा स्लॅब कोसळला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. या इमारतीतून ४० जणांची सुटका करण्यात आली आहे. आशापुरा इमारतीचे बांधकाम सुरु होते. काही दिवसांपूर्वी मालाड मालवणी परिसरात एक इमारत कोसळली होती. या दुर्देवी दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला होता. ठाण्यातही मागच्या आठवड्यात एका इमारतीचा स्लॅब कोसळला होता. मुंबई आणि आसपासच्या परिसरात दरवर्षी पावसाळ्यात अशा घटना घडत असतात.

    दरम्यान जुन्या-जर्जर झालेल्या या इमारती कोसळून होणाऱ्या दुर्घटनांमध्ये अनेक निष्पाप व्यक्तींना आपल्या प्राणांना मुकावे लागते. दरवर्षी मुंबई महानगर क्षेत्रात अशा घटनांमध्ये अनेकांचा मृत्यू होतो. काही वेळा पालिका किंवा अन्य यंत्रणांकडून इमारती रिकाम्या करण्याच्या नोटीसा पाठवल्या जातात.

    पण पर्यायी जागेची व्यवस्था नसल्यामुळे किंवा दिलेली जागा राहण्यायोग्य नसल्यामुळे नागरिक आपला जीव धोक्यात घालून त्याच धोकादायक इमारतींमध्ये राहतात. मग अचानक एकदिवस इमारत कोसळल्याची बातमी येते. यंदाच्या पावसाळ्यात सुद्धा इमारत कोसळण्याचे सत्र थांबलेले नाही. इमारत कोसळून दुर्घटना झाल्यानंतर मग त्यावरुन जोरदार राजकारण सुरु होतं. राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु होता. पालिका, राज्य सरकारला जबाबदार धरलं जाते. मालाड मालवणी इमारत दुर्घटनेमध्ये हे दिसून आलं होतं.